तुम्ही गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले पनीर अनेकदा खाल्ले असेल, पण गाढवीच्या दुधापासून बनवलेले पनीर ऐकले आहे का? गाढवीच्या दुधापासून बनवलेल्या पनीरचा दर मात्र सर्वाधिक असतो. जो ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
गाई किंवा म्हशीच्या दुधाप्रमाणेच गाढवाच्या दुधापासून पनीर तयार केलं जातं. आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की, गाढवाचं दूध हे अतिशय महाग असतं. त्यामुळे यापासून तयार केलेलं पनीर देखील अतिशय महाग अशतं. पण या महागड्या पनीरचे असंख्य फायदे आहेत. गाढवाच्या दुधापासून बनवलेले पनीर आणि चीज खूप महाग असतात. ज्या लोकांना सामान्य गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले पनीर महाग वाटते, त्यांना गाढवाच्या दुधापासून बनवलेल्या पनीरच्या किंमती ऐकून आश्चर्य वाटेल.
भारतात ३००-४०० रुपये प्रति किलोला विकले जाणारे पनीर सामान्य माणसाच्या ताटात क्वचितच दिसते. गाढवाच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची किंमत १ लाख रुपये प्रति किलो आहे. गाढवाचे दूध जगभरात द्रवरूप सोने म्हणून ओळखले जाते. त्याचे कारण त्यात आढळणारे प्रचंड पोषक घटक आहेत. त्यात प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लायसोझाइम असते, ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
इतकेच नाही तर असे म्हटले जाते की, गाढवाच्या दुधात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे रोगांशी लढण्याची ताकद देतात. असेही म्हटले जाते की रोमन राणी क्लियोपात्रा या दुधाने अंघोळ करायची जेणेकरून त्वचा चमकदार होईल. गाढवीचे दूध इतके महाग आहे कारण ते एका दिवसात फक्त २०० ते ३०० मिली दूध देते. अशा परिस्थितीत, एक लिटर दुधासाठी अनेक गाढवांची आवश्यकता असते. ते चीजमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रक्रिया खर्च खूप जास्त असतो. म्हणजेच, जर २५ किलो गाढवीचे दूध काढले तर त्यापासून फक्त एक किलो चीज बनवता येते.
एक लिटर गाढवीच्या दुधाची किंमत प्रति लिटर ५००० रुपयांपर्यंत आहे. त्याच्या दुधात जास्त लॅक्टिक अॅसिड असते, ज्यामुळे कोणालाही पोटाशी संबंधित समस्या येत नाहीत. त्यात गाय आणि म्हशीच्या दुधापेक्षा जास्त ट्रेस देखील असतात, ज्यामुळे ते अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाते. भारतातील अनेक स्टार्टअप गाढवीच्या दुधावर काम करत आहेत. गुजरात आणि तामिळनाडूमध्येही त्याची शेती केली जात आहे.