SBI Threat: मुंबईतील भारतीय स्टेट बँकेच मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची फोन वरून धमकी, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चेअरमनचं अपहरण करुन मारण्याचीही धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू.
KDMC Employees: कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 16,500 रूपयांचा बोनस जाहीर, बोनसची रक्कम येत्या बुधवारपर्यंत कामगारांच्या खात्यात जमा होणार-आयुक्त
Ratnagiri- MLA Rajan Salvi: रत्नागिरी- आमदार राजन साळवींच्या सुरक्षेत वाढ, साळवींना वाय प्लस दर्जाची सुरक्षा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साळवींवर का झाले मेहरबान?, सुरक्षा वाढीचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात?
State Govt. Employess: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर, कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपयांचा ' उत्सव अग्रीम', चतुर्थश्रेणीसह गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना बोनस.
Kolhapur Crack Collapsed: कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज दरम्यान पालघाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीस बंद, दरड काढण्याचे काम सुरू.
Mumbai Municipal Corporation Action : मुंबईत आरोग्य सेविकांकडून गोळ्यांचे वाटप मुंबई महापालिकेकडून बंद, जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांना जुलाब, उलट्यांचा त्रास, पश्चिम उपनगरात वाटप करण्यात आलेल्या नित्कृष्ठ गोळ्यांमुळे मुलांना त्रास.
Manohar Mhaisalkar passed away : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं निधन
RTO Rules : राज्यात चालकासोबत प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक, मोटार वाहन कायद्यात सुधारणा, सीटबेल्ट न लावल्यास भरावा लागणार दंड, 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणीला सुरुवात.
Thane Auto Rickshaw: ठाण्यात रिक्षावाल्यांची मुजोरी वाढली, रिक्षावाल्याने मुलीला फरफटत नेले, मुलगी जखमी, माजी नगरसेवक संजय वाघुलेंची पोलीस ठाण्यात तक्रार, रिक्षावाल्याचा शोध सुरू.
Narayan Rane: वरळी कुणाची नाही, वरळी मुंबईतच- नारायण राणे
Narayan Rane: अंधेरी निवडणुकीत भाजपचाच विजय होणार- नारायण राणे
Hearing by court on 12 MLC: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी, नोटीस देऊनही शपथपत्र दाखल न केल्यामुळे सुनावलं, शपथपत्र दाखल केल्याशिवाय आमदार नियुक्ती नाही- कोर्ट.
Pune Rain: पुणे आणि परिसरात जोरदार पाऊस, दिवेघाटात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी.
Himachal Pradesh Assembly Election: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक तारीख जाहीर, 12 नोव्हेंबरला मतदान, 8 डिसेंबरला होणार मतमोजणी, केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती.
Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग होणार नाही, वाराणसी कोर्टानं हिंदू गटाची मागणी फेटाळली.
Jammu & Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
Police Requirements : राज्यात पोलीस भरतीचा जीआर जारी, 11,443 पदं भरण्यासाठी मान्यता, लवकरच होणार पोलीस भरती.
Aashish Shelar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची टीका
Aaditya Thackeray On State Govt : राज्यात माणुसकी विरुद्ध खोकेसूर अशी लढत सुरू, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका. बीएमसी दडपशाही आणि हुकूमशाहीखाली काम करंतय, आदित्य ठाकरेंची बीएमसीवर टीका
Pune Shashikant Ghorpade : पुण्यातील पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह नीरा नदीत सापडला, शशिकांत घोरपडे 2 दिवसांपासून होते बेपत्ता, नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय.
Vinayak Raut On BMC : महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचतंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलाय. महापालिकेचं प्रशासन बरखास्त करण्याची मागणी खासदार विनायक राऊतांनी केलाय.
ऋतुजा लटकेंचा विजय एक हजार टक्के निश्चित असा विश्वास खासदार विनायक राऊतांनी व्यक्त केलाय.
World Bank Alert : जगावर आर्थिक मंदीचं सावट, जागतिक बँकेचा मोठा इशारा, भारतीय अर्थव्यवस्था मात्र जगाला दिशा दाखवेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचं कौतुक.
Avdhoot Tatkare Joins BJP : माजी आमदार अवधूत तटकरेंचा भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.
Election Commission Press Conference : निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद, गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता.
Corona New Varient : कोरोनाचा नवा XBB व्हेरियंट आढळला, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे राज्यात नवे रुग्ण, देशभरात कोरोना XBBचे 71 रुग्ण, राज्यात नव्या व्हेरियंटचे 5 रुग्ण.
Andheri By Poll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत 35 हजार मतांनी विजयी होऊ असा विश्वास भाजपचे उमेदवार मुरजी पटेलांनी व्यक्त केलाय. लटके राजीनामा प्रकरणात भाजपचा हात नाही, मुरजी पटेल यांचं वक्तव्य, भाजपं असं घाणेरडं राजकारण करत नाही असं भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचं वक्तव्य
Electricity Hike : राज्यातील वीज पुन्हा महागण्याची शक्यता, कोविड काळातील थकबाकीचा ग्राहकांना फटका, महावितरण दरवाढीचा प्रस्ताव देणार
Rutuja Latke Resignation : ऋतुजा लटकेंचा राजीनामा अखेर मुंबई महापालिकेकडून मंजूर, लटकेंचा राजीनामा महापालिका प्रशासनानं ठेवला तयार, लटकेंना मिळणार राजीनामा स्वीकार झाल्याचं पत्र.
Paksitan Drone : पंजाब सीमेवर पाडला पाकिस्तानी ड्रोन, बीएसएफच्या जवानांनी पाडला पाकिस्तानी ड्रोन, चिनी बनावटीचा पाकिस्तानी ड्रोन पाडला, बीएसएफ जवानांकडून 17 राऊंड्स फायर
Pune Sextortion : 1400 पुणेकर सेक्सटॉर्शनच्या विळख्यात, नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटलं, पुण्यात सेक्सटॉर्शनमुळं दोन तरुणांची आत्महत्या, सेक्सटॉर्शनच्या पुण्यात महिन्याला 125 घटना.
Solapur Pipeline Burst : सोलापुरातील बार्शीत पाण्याची पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया, बऱ्याच प्रयत्नानंतर गळती रोखण्यात यश.
Avdhoot Tatkare Joins Bjp : अवधूत तटकरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अवधूत तटकरे खासदार सुनील तटकरेंचे पुतणे, अवधूत तटकरे आज मुंबईत करणार भाजपमध्ये प्रवेश.
Jalgaon Eknath Khadse : जळगाव दूध संघात दीड कोटींची चोरी झाल्याचा आरोप, दूध संघातील गैरव्यवहाराबाबत खडसे आक्रमक, दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी खडसेंचा ठिय्या, गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा एकनाथ खडसेंचा इशारा.
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर आज सीबीआय कोर्टात सुनावणी, देशमुखांना दिलासा मिळणार का याकडं लक्ष
Andehri By Poll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत लटके विरुद्ध पटेल सामना, ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आज उमेदवारी अर्ज भरणार, भाजप-शिंदे गटाकडून मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरणार
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.