Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Chandra Grahan Live: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण संपलं, हिंदू धर्माशास्त्रानुसार आता हे उपाय करा

Chandra Grahan 2022 Time in India Live : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपलं आहे. चंद्रग्रहण सूतक कालावधीही संपला आहे.

Chandra Grahan Live: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण संपलं, हिंदू धर्माशास्त्रानुसार आता हे उपाय करा
LIVE Blog

Chandra Grahan 2022 Time in India Live:  या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपलं आहे. आज चंद्रग्रहण (Lunar Eclipse Timing in India ) 6 वाजून 20 मिनिटांनी संपलं आहे. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या? 

08 November 2022
08 November 2022 18:23 PM

ग्रहणानंतर घर आणि आजूबाजूची जागा अपवित्र होते. स्वच्छ पाण्यात गंगाजल मिसळून घरभर शिंपडा. तसेच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. असे केल्याने ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होतात. पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी प्यावं. विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करावी.

08 November 2022 18:14 PM

ग्रहण काळात भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा. कारण भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत स्थितीत आहे, त्यांनी चंद्रग्रहणाच्या वेळी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा. चंद्राची स्थिती चांगली होईल.

08 November 2022 18:12 PM

ज्योतिषशास्त्रात ग्रहण ही अत्यंत अशुभ घटना मानली जाते. ग्रहणानंतर काही वस्तू स्वतःच्या हाताने दान कराव्यात असे सांगितले जाते. या दरम्यान दूध, तांदूळ आणि इतर पांढरे पदार्थ दान करणे फायदेशीर ठरतं.

 

08 November 2022 17:55 PM

आज कार्तिकी पौर्णिमा आहे. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशी होते. पौर्णिमेचा दिवस चंद्राला समर्पित असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो, त्यामुळे ग्रहण काळात नामजप करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

 

08 November 2022 17:48 PM

भारतातील अनेक शहरांमध्ये चंद्रग्रहण दिसू लागले आहे. कोलकाता, भोपाळ आणि जयपूरमध्येही चंद्रग्रहण दिसत आहे. थोड्याच वेळात अहमदाबाद, मुंबई यासह भारतातील इतर भागातही चंद्रग्रहण दिसेल.

08 November 2022 17:43 PM

चंद्रग्रहणानंतर पूजेशी संबंधित कोणत्याही वस्तूला लगेच हात लावू नये. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्यानंतरच स्पर्श करावा. पण संध्याकाळ असेल तर जल अर्पण करू नका. अन्यथा दुसऱ्या दिवशीच तुळशीच्या रोपाला स्पर्श करावा.

 

08 November 2022 17:30 PM

चंद्र ग्रहणातील स्तुती

सोऽसौ वज्रधरो देव आदित्यानां प्रयत्नतः।, सहस्रनयनःशक्रो ग्रहपीडां व्यपोहतु।।

चतुःशृङ्गः सप्तहस्तः त्रिपादो मेषवाहनः।, अग्निश्चन्द्रोपरागोत्थां ग्रहपीडां व्यपोहतु।

यः कर्मसाक्षी लोकानां धर्मो महिषवाहनः।, यमश्चन्द्रोपरागोत्थां ग्रहपीडां व्यपोहतु।।

रक्षोगणाधिपः साक्षात्प्रलयानलसन्निभः।, खड्गचर्मातिकायश्च रक्ष पीडां व्यपोहतु।।

नागपाशधरो देवः सदा मकरवाहनः।, वरुणोम्बुपतिः साक्षाग्रहपीडां व्यपोहतु।।

प्राणरूपो हि लोकानां चारुकृष्णमृगप्रियः।, वायुश्चन्द्रोपरागोत्थग्रहपीडां व्यपोहतु।।

योऽसौ निधिपतिर्देवः खड्गशूलगदाधरः|, चन्द्रोपरागकलुषं धनदोऽत्र व्यपोहतु।।

त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावरनाणि चराणि च ।, ब्रह्मार्कविष्णुयुक्तानि तानि पापं दहन्तु मे ।।

08 November 2022 17:22 PM

चंद्रग्रहणाचा या राशींवर होईल सकारात्मक परिणाम

तूळ - ज्योतिष शास्त्रानुसार, तूळ ही शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम होणार नाही. या काळात या लोकांवर तणाव कमी असेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. या दरम्यान, प्रगतीची शक्यता आहे. भागीदारी व्यवसाय करणार्‍यांना मोठा फायदा होईल.

मकर - या राशीचा स्वामी शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा प्रभाव पडणार नाही. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. या दरम्यान अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. या काळात संयम बाळगा.

कुंभ - या राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. ज्योतिष शास्त्र सांगते की ग्रहण काळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. व्यापार्‍यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. दीर्घकाळ प्रलंबित कामातही तुम्हाला यश मिळू शकते.

08 November 2022 17:18 PM

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात अनेक कामे वर्ज्य असतात. ग्रहणकाळात खाणे पिणे वर्ज्य असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. यावेळी एकाच ठिकाणी बसून भगवंताचे नामस्मरण करावे. या दरम्यान मंत्रोच्चार आणि स्तुती पठण केल्यास शुभ फळ मिळते आणि ग्रहणाचा प्रभाव दूर होतो.

08 November 2022 17:15 PM

Chandra Grahan Mantra: चंद्रग्रहणाच्या काळात धनप्राप्ती आणि सुख-समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्रात काही तोडगे सांगण्यात आले आहेत. चंद्रग्रहणादरम्यान या मंत्राचा जप केल्याने शुभ फळ मिळेल, अस हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. ज

1. ऊँ इन्द्राय नमः
2. ऊँ अग्नये नमः
3. ऊँ सोमाय नमः
4. ऊँ त्वष्ट्राय नमः
5. ऊँ रुद्राय नमः
6 . ऊँ पूखनाय नमः
7. ऊँ विष्णुवे नमः
8. ऊँ अश्विनीये नमः
9. ऊँ मित्रावरूणाय नमः
10. ऊँ अंगीरसाय नमः

08 November 2022 17:13 PM

खग्रास चंद्रग्रहण ही शास्त्रज्ञांच्या मते एक दुर्मिळ घटना आहे. विशेष म्हणजे ग्रहण काळात चंद्राचा लाल रंग आहे. त्यामुळे याला ब्लड मून म्हणूनही ओळखले जात आहे. याशिवाय हे वर्षातील शेवटचे ग्रहण आहे. नासाच्या म्हणण्यानुसार 2025 मध्ये म्हणजेच तीन वर्षानंतर असं खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.

 

08 November 2022 16:53 PM

तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला चंद्र दिसत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मवरून ग्रहणाचा थेट लाईव्ह पाहू शकता. चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) वर केलं जातं आहे. तुम्ही व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टच्या YouTube पेजवर किंवा त्यांच्या वेबसाइटवर चंद्रग्रहणाचा आनंद घेऊ शकाल. जगभरातील लोकांना ही खगोलीय घटना पाहता येणार आहे.

08 November 2022 16:45 PM

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीची सावली चंद्रवर पडल्यानंतर चंद्रग्रहण होतं. फिलिपिंसमधून चंद्रग्रहण दिसलं.

08 November 2022 16:44 PM

ऑस्ट्रेलियाच्या एडलेडमध्ये दिसलं चंद्रग्रहण

08 November 2022 16:42 PM

भारतात चंद्रग्रहण संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी संपणार आहे. 

08 November 2022 16:35 PM

भारतात कोलकाता, कोहिमा, पटणा, पुरी, रांची आणि इटानगरमध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसेल तर उर्वरित भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल.

08 November 2022 16:30 PM

भारतातील ईटानगरमध्ये चंद्रग्रहण दिसण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील अनेक शहरात चंद्रग्रहण दिसलं. ऑस्ट्रेलियाच्या एडलेडमध्ये चंद्रग्रहण दिसू लागलं आहे.

08 November 2022 15:51 PM

खग्रास चंद्रग्रहण आता तीन वर्षानंतर म्हणजेच 2025 मध्ये दिसणार आहे. या दरम्यान तीन वर्षे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. 

08 November 2022 15:43 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्वच राशींवर पाहायला मिळेल. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ परिणाम दिसतील. मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ राशीसाठी हा ग्रहण शुभ ठरेल. तर मेष, वृषभ, सिंह, मीन, मकर, धनु या राशींसाठी हे ग्रहण अशुभ ठरेल. 

 

08 November 2022 12:35 PM

Chandra Grahan 2022 LIVE Updates : तुमच्या प्रमुख शहरातील ग्रहणाची वेळ जाणून घ्या.

- मुंबई: संध्याकाळी 6:05 ते 6:18 पर्यंत
- पुणे : संध्याकाळी 6:01 ते 6:18 पर्यंत
- नाशिक : सायंकाळी 5:55 ते 6:18
- नागपूर : संध्याकाळी 5:36 ते 6:18
- पणजी: संध्याकाळी 6:06 ते 6:18 पर्यंत

- नवी दिल्ली: संध्याकाळी 5:32 ते 6:18 पर्यंत
- कोलकाता: दुपारी 4:56 ते संध्याकाळी 6:18
- बंगळुरू: संध्याकाळी 5.53 ते संध्याकाळी 6:18
- प्रयागराज : संध्याकाळी 5:18 ते 6:18
- कानपूर: संध्याकाळी 5:23 ते 6:18 पर्यंत
- हरिद्वार: संध्याकाळी 5:26 ते 6:18 पर्यंत
- धर्मशाळा: संध्याकाळी 5:30 ते संध्याकाळी 6:18

- रांची: संध्याकाळी 5:07 ते 6:18 पर्यंत
- पाटणा: संध्याकाळी 5:05 ते 6:18 पर्यंत
- भोपाळ : संध्याकाळी 5:40 ते 6:18
- चेन्नई: संध्याकाळी 5:42 ते 6:18 पर्यंत
- हैदराबाद: संध्याकाळी 5:44 ते 6:18 पर्यंत

- अहमदाबाद : संध्याकाळी 6:00 ते संध्याकाळी 6:18
- सूरत : संध्याकाळी 6:02 ते 6:18 पर्यंत
- जामनगर : संध्याकाळी 6:11 ते 6:18 पर्यंत
- चंदीगड: संध्याकाळी 5:31 ते 6:18 पर्यंत
- जयपूर: संध्याकाळी 5:41 ते 6:18 पर्यंत
- जोधपूर: संध्याकाळी 5:53 ते 6:18 पर्यंत
- उज्जैन: संध्याकाळी 5:47 ते 6:18 पर्यंत
- तिरुवनंतपुरम: संध्याकाळी 6:02 ते 6:18 पर्यंत
- जम्मू: संध्याकाळी 5:35 ते 6:18 पर्यंत

08 November 2022 12:29 PM

Chandra Grahan 2022 LIVE Updates : चंद्रग्रहण दरम्यान काय करावे. सुतक कालावधी सुरु होण्यापूर्वी तुळशीचे पान तोडू नयेत. सूतक काळात तुळशीचे पान तोडणे अशुभ मानले जाते. खाण्यापिण्यात तुळशीची पाने टाका, ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडत नाही.

ग्रहणकाळात निर्जन ठिकाणी बसून भगवान शिवाच्या गायत्री मंत्रांचा जप करा. ग्रहण काळात दान करणे शुभ मानले जाते, शक्य असल्यास गरीब आणि गरजूंना धान्य, फळे, ब्लँकेट इत्यादी दान करा.

ग्रहण संपल्यानंतर गंगाजल टाकून स्नान करावे. मंदिराचे दरवाजे उघडा, सर्व देवतांना गंगाजलाने स्नान घाला.

08 November 2022 12:10 PM

Chandra grahan Live Update : चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, याबाबत अनेक गैरसमज आहेत. (Food During lunar Eclipse) आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का? तसेच अन्न खाऊ शकतो का? याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...

08 November 2022 12:03 PM

Chandra grahan Live Update : चंद्रग्रहणाच्या  (Lunar Eclipse 2022) सूतक काळात घराबाहेर पडत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  आज तुळशी विवाह (Tulsi Vivah 2022) करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांनी अजून तुळशी विवाह केला नाही. त्या लोकांना प्रश्न पडला आहे की, आज ग्रहणाच्या दिवशी तुळशीचा विवाह करता येतो का? यासंदर्भात शास्त्र काय सांगतं ते जाणून घ्या.

तुळशी विवाहचा आज शेवटचा दिवस, चंद्रग्रहणात लग्न करणं शुभ की अशुभ

08 November 2022 12:00 PM

Chandra grahan Live Update : चंद्रग्रहण : काही राशींसाठी वर्षातील शेवटचं चंद्रग्रणह शुभ, तर काही राशींसाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते. या राशींच्या व्यक्तींना प्रेम प्रकरणात काळजी घ्यावी लागणार आहे.

(अधिक जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा )

08 November 2022 11:57 AM

Chandra grahan Live Update : चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा काही गोष्टी ठेवाव्या लागतात. वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) असून, ते भारतातील बहुतांश भागांमध्ये दिसणार आहे. भारतात हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा सूतक काळ 8 वाजून 21 मिनिटांनी सुरु होणार आहे.  

चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

08 November 2022 11:52 AM

Chandra grahan Live Update : यंदाच्या वर्षातील अखेरचं चंद्रग्रहण आज 8 नोव्हेंबर 2022 दिसणारआहे (lunar eclipse november 2022). काही दिवसांपूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण दिसले होते. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र-सूर्य ग्रहण शूभ नसतो. कारण त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडत असतो, असे सांगितले जाते. (Chandra Grahan 2022 Date and Time in India)

Read More