Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

IND vs SL 2nd ODI LIVE Score: भारत श्रीलंका सामना रोमांचक स्थितीत; के एल आणि अक्षर सामना जिंकवणार का?

IND vs SL 2nd ODI LIVE: आज भारत आणि श्रीलंका (ind vs sl 2nd odi) यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे.

IND vs SL 2nd ODI LIVE Score: भारत श्रीलंका सामना रोमांचक स्थितीत; के एल आणि अक्षर सामना जिंकवणार का?
LIVE Blog

IND vs SL 2nd ODI LIVE: आज भारत आणि श्रीलंका (India vs SL 2nd ODI) यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. टीम इंडियाला दुसरा वनडे सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसाठी 'करो या मरो' चा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे. याआधी दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 28 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले होते. 

12 January 2023
12 January 2023 20:06 PM

कॅप्टन हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर आता सामना जिंकवून देण्याची जबाबादारी के एल राहुल आणि अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. सामना जिंकण्यासाठी 88 चेंडूत 50 धावांची गरज...

12 January 2023 18:33 PM

दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ अडचणीत आला आहे. फक्त 86 धावांवर चौथा गडी बाद झाला. एलबीडब्ल्युच्या अपिलनंतर डीआयएस घेण्यात आला. त्यावर अय्यर बाद झाल्याचं दिसलं.

12 January 2023 18:12 PM

टीम इंडियाला तिसरा धक्का बसला असून विराट कोहली फक्त 4 धावा करत बाद झाला. त्यानंतर आता मैदानात के एल राहूल आणि श्रेयस अय्यर पाय रोवून उभे आहेत.

12 January 2023 17:45 PM

टीम इंडियाला बसला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा 17 रन्सवर माघारी परत

12 January 2023 16:41 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंका ऑल आऊट

श्रीलंका ऑल आऊट, भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य

12 January 2023 16:41 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंका ऑल आऊट

श्रीलंका ऑल आऊट, भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य

12 January 2023 16:11 PM

India vs SL 2nd ODI LIVE:  भारताला मिळाली आठवी विकेट

श्रीलंकेला आठवा धक्का, चामिका करुणारत्ने बाद

12 January 2023 15:39 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंकेला सातवा धक्का

टीम इंडियाची अप्रतिम गोलंदाजी, वानिंदु हसरंगा बाद 

12 January 2023 15:32 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंकेला सहावा धक्का

टीम इंडियाची अप्रतिम गोलंदाजी, श्रीलंकेचे 126 धावांत 6 विकेट  

12 January 2023 15:16 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंकेला चौथा धक्का  

अर्धशतक झळकावल्यानंतर नुवानिडू फर्नांडो बाद

12 January 2023 14:59 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंकेच्या तीन विकेट   

भारताला दुसरे यश मिळाले, कुलदीप यादवने कुसलला केले बाद 

12 January 2023 14:27 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंकेच्या 10 ओव्हरमध्ये 58 धावा 

श्रीलंका संघाने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 58 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा फर्नाडो 25 तर मेंडीस 14 धावावर खेळतो आहे. श्रीलंकेला एका मोठ्या पार्टनरशीपची गरज आहे. तरच श्रीलंका टीम इंडियासमोर मोठी धावसंख्या उभारू शकेल. 

12 January 2023 14:01 PM

India vs SL 2nd ODI LIVE: श्रीलंकेविरुद्ध भारताला मिळाले पहिले यश

सिराजने ओपनर अविष्का फर्नांडोला केले बाद 

12 January 2023 13:51 PM

India vs SL 2nd ODI LIVE: दोन्ही संघातील बदल

श्रीलंकेच्या संघात मधु शंका आणि पथुम निसंका या दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर जावे लागले आहे. तर भारतीय संघात युजवेंद्र चहलला गेल्या सामन्यात दुखापत झाल्याने त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात समावेश केले आहे. 

12 January 2023 13:48 PM

India vs SL 2nd ODI LIVE: दुसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात

भारताकडून शमी प्रथम गोलंदाजीची सुरुवात करत आहे. तर श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि नुवानिडू फर्नांडो सलामीला उतरले आहेत. 

12 January 2023 13:37 PM
12 January 2023 13:09 PM

श्रीलंकेने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

12 January 2023 12:35 PM

लाईव्ह सामना कुठे पाहणार?
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच Hotstar वर लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. 

लाइव्ह मॅच मोफत बघता येणार
हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहता येणार आहे. 

12 January 2023 12:35 PM

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह. 

श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा. 

Read More