Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

IND vs SL 3rd ODI Live:श्रीलंकेला दुसरा झटका; 22 वर 2 गडी बाद

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2 सामने जिंकून आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. उभय संघांमधील तिसरा वनडे सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard rohit sharma virat kohli marathi news)  

IND vs SL 3rd ODI Live:श्रीलंकेला दुसरा झटका; 22 वर 2 गडी बाद
LIVE Blog

India vs Sri Lanka 3rd ODI Live : भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

15 January 2023
15 January 2023 18:16 PM

 डोंगराएवढं आव्हान पार करताना श्रीलंकेची खराब सुरूवात, 22 वर 2 गडी बाद

15 January 2023 16:02 PM

शतक साजरं केल्यानंतर शुभमन गिलच्या उडाल्या दांड्या आहेत. 97 चेंडूवर 116 धावांची खेळी करत भारताला मजबूर स्थितीत पोहवण्याचं काम शुभमनने केलंय. 

15 January 2023 15:42 PM

शुभमन गिलचं शतक पूर्ण, 89 बॉल्समध्ये पूर्ण केलं शतक

15 January 2023 15:40 PM

टीम इंडियाचे 200 रन्स पूर्ण, विराट कोहलीनेही पूर्ण केलं अर्धशतक

15 January 2023 15:08 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard :  विराट कोहली आणि शुभमची कमाल खेळी

विराट कोहली आणि शुभमन गिलने 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण केली आहे. 

15 January 2023 15:04 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard : शुभमन गिलची कमाल खेळी 

15 January 2023 15:00 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard : शुभमन गिलचं अर्धशतक

शुभमन गिलने शानदार अर्धशतक झळकवलंय. शुभमन गिलने 52 चेंडूत 8 चौकार मारत 50 धावा केल्या.

15 January 2023 14:57 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard :  भारताचे 100 रन्स पूर्ण

16 ओव्हरमध्ये भारताने 1 गडी गमवतं 100 धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्मा आणि शुभमं गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ही धावसंख्या उभी केली आहे.

15 January 2023 14:54 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard :  भारताला पहिला धक्का

रोहित शर्माला करुणारत्नेने आऊट केलं. रोहितचं अर्धशतक पुन्हा एकदा हुकलं. रोहितने 49 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 42 धावा केल्या.

15 January 2023 14:50 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard :  श्रीलंकेचा प्लेइंग-11: 

अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आशान भंडारा, चारिथ अस्लंका, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, जे. वेंडरसे, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, लाहिरू कुमारा

15 January 2023 14:50 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard :  भारतीय संघातील प्लेइंग-11 : 

भारताचे प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

15 January 2023 14:47 PM

India vs Sri Lanka 3rd ODI Live Scorecard :  भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बँटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आलंय. हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे.

Read More