Maharashtra Pune Bandh LIVE Updates : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी 7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Pune Bandh LIVE Updates : छत्रपती शिवाजी महाराज हे आजही आदर्श पुरुष. साडेतीनशे वर्षांपासून या आदरामधे वाढ. आज त्यांना आदर्श म्हणा, अस सांगायची अशी वेळ आलीय हे दुर्दैव. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर नुपूर शर्मावर जशी डिसीप्लीनरी अॅक्शन झाली तशीअॅक्शन व्हायला हवी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे यांनी यावेळी केली.
- महापुरुषांचे अवमान होत असताना देवेंद्र फडणवीस एक शब्द ही बोलत नाहीत. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर यांच्या विषयी द्वेष आहे, अशी टीका मोर्चावेळी सुषमा अंधारे यांनी केली.
Pune Bandh LIVE Updates :हा मोर्चा अपयशी होण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कोणी म्हणाले खासदार उदयनराजेंना अटक करणार आहे. उदयनराजेंना हात लावून दाखवा. कोश्यारी यांची हकालपट्टी ही आमची मागणी आहे. ती झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असे नगरसेवक दीपक मानकर यांनी इशारा दिला आहे.
आजच्या पुणे बंदला लोकांची साथ आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, असे माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सरकारवर टीका केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक आहेत पण आपलं सरकार काहीच करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांनी आता पर्यंत राजीनामा द्यायला हवा होता. प्रत्येकवेळी ते अपमान करत आले आहेत, असे खोचक टोला राज्यपाल यांना आदित्य यांनी लगावला.
Pune Bandh LIVE Updates : महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्यांविरोधात पुण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी झालेत. आज पुण्यात कडकडीत बंद दिसून आला आहे. मूक मोर्चा आता लाल महल येथे दाखल.
मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद
Pune Bandh LIVE Updates : पुणे बंद मोर्चामध्ये अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते आणि नागरिक सहभागी झाले आहेत. मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #MaharashtraBandh #Bandh #PuneBandhUpdates pic.twitter.com/idu0g2JwT7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
'राज्यपाल यांची सेवा समाप्ती करण्यात यावी'
Pune Bandh LIVE Updates : पुणे बंद मोर्चामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी झाल्यात. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपाल यांची सेवा समाप्ती करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.
Pune Bandh LIVE Updates : पुण्यातील सर्व पक्षीय बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मूक मोर्चात मुस्लिम बांधव हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर घेऊन सहभागी झालेत. तर लहान मुलं सर्वांचं आकर्षण ठरत आहेत. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये मोर्चात सहभागी झाले आहेत.
Pune Bandh LIVE Updates : पुण्यातील मूक मोर्चात मुस्लिम बांधव हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर घेऊन सहभागी झालेत. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #MaharashtraBandh #Bandh #PuneBandhUpdates pic.twitter.com/OH0RqLCaoF
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
खासदार उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी
Pune Bandh LIVE Updates : पुण्यातील सर्व पक्षीय बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मूक मोर्चाला सुरुवात झालेय. या मोर्चात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी झालेत । उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांना पत्रही पाठवले होते.
'भाजप वगळता सर्व पक्षांचा बंदला पाठिंबा'
Pune Bandh LIVE Updates : पुणे बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भाजप वगळता सर्व पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आणि विरोधी पक्षांनी आज पुण्यात बंद पुकारला आहे. राज्यापालांचे असे वक्तव्य हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
Maharashtra | Several Maratha groups & Oppn parties call a shutdown in Pune today against Governor BS Koshyari's remark on Chhatrapati Shivaji Maharaj
NCP's Pune president Prashant Jagtap says, "It's an insult to Maharashtra. All parties, except BJP, have supported the shutdown" pic.twitter.com/oLuddhWwlI
— ANI (@ANI) December 13, 2022
राज्यभर आंदोलनाचं लोण पसरेल, राऊत यांचा इशारा
Pune Bandh LIVE Updates : पुणे आंदोलनाची दखल केंद्राने घ्यावी, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यभर आंदोलनाचं लोण पसरेल, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या पत्राचा उपयोग नाही, असे राऊत म्हणाले. पुणेकरांच्या आंदोलनाची दखल घ्या, असे राऊत म्हणाले.
Pune Bandh LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हाक, सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन. मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर पुण्यातील रिक्षाचालकांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यातील बाईक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालक आक्रमक झालेत.
- महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात पुणे बंद
- मविआ, सामाजिक संघटनांकडून मोर्चाला सुरुवात
- सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन
- मोर्चात खासदार उदयनराजे सहभागी होण्याची शक्यता
- मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
- मोर्चासाठी पुण्यातील बाजारात शुकशुकाट
बंदला छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा
Pune Bandh LIVE Updates : पुणे बंदला छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा आहे. छत्रपती संभाजीराजे पुणे बंद मध्ये सहभागी होणार होते. परंतु दिल्लीमध्ये महत्वाची बैठक असल्याने त्यांना पुण्यात येता आले नाही. आपला पुणे बंदला पाठिंबा असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी कळविले आहे.
Pune Bandh LIVE Updates : पुण्यामध्ये अत्यावश्यक घटक वगळता सर्व काही बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष करुन सकाळी सकाळी गर्दी होणारी ठिकाण म्हणजे खाण्याचे स्टॉल, चहा कॉफीचे स्टॉल या ठिकाणी शुकशुकाट आहे. हे स्टॉल बंद असल्याने हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांची मात्र काहीशी अडचण होताना दिसत आहे.
पुण्यात मूक मोर्चा
Pune Bandh LIVE Updates : राज्यपाल हटाव मागणीसाठी आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मूक मोर्चा काढण्यात येत आहे. सुरक्षेसाठी साडेसात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अपमानास्पद घोषणांवर बंदी करण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलिसांच्या तुकडी घटनास्थळी दाखल
Pune Bandh LIVE Updates : पुण्यातील रिक्षाचालकांनी काल केलेला चक्काजाम अखेर पुणे पोलिसांनी मोडून काढला. आरटीओ कार्यालयासमोर शेकडो रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांसह ठिय्या मांडला होता. त्यामुळे संपूर्ण वाहतूक खोळंबा झाला. अखेर राज्य राखीव पोलिसांच्या तुकडी घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व रिक्षाचालकांना रस्ता मोकळा करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र रिक्षा चालकांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनीच रस्त्यावरून रिक्षा हटवल्या आणि रिक्षाचालकांनाही हटकलं.
केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी केली अटक
Pune Bandh : रिक्षा संघटना आंदोलन प्रकरणी संघटना अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी केली अटक । शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गार्डन पोलिसांनी केला क्षीरसागर यांच्यासह सहा लोकांवर गुन्हा दाखल
रिक्षा चालकांचा आंदोलन चिघळणार
बाईक, टॅक्सी बंद करावी या मागणीसाठी रिक्षा संघटनांनी केला होता काल आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम (हेही बातमी वाचा - Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात)
शाळा बंदबाबत संभ्रम, सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम!
Pune Bandh LIVE : शहरातील शाळा महाविद्यालयमध्ये बंद बाबत कुठल्याच स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. असं असलं तरी रिक्षा वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे शाळामध्ये फारशी उपस्थिती असण्याची शक्यता नाही. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सुमारे साडेसात हजार पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांमधला संभ्रम कायम ।अनेक शाळा सुरु, मात्र आपल्या पाल्यांना पालकांना शाळेमध्ये सोडवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. स्कूल व्हॅन बंद आहेत तर काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #School #PuneSchool pic.twitter.com/yJEi9XUlXs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय
Pune Bandh LIVE : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत तसेच महापुरुषाबाबत वारंवार अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे शहर बंद बाबत पुकारण्यात आला आहे. त्याविरोधात संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संबधित संघटनांनी घेतला आहे. मार्केट यार्ड आज रात्रीपासूनच बंद आहे.
पुणे बंदमध्ये संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय । छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत तसेच महापुरुषाबाबत वारंवार अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणेशहर बंद बाबत पुकारण्यात आला आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #MaharashtraBandh #Bandh pic.twitter.com/q3QSY164bp
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
पुण्यात या रस्त्यावरील वाहतूक बंद
Pune Bandh LIVE : पुण्यामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल समोरच्या काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
- लक्ष्मी रस्ता : सोन्या मारुती चौक ते टिळक चौक
- शिवाजी रस्ता : स गो बर्वे चौक ते बेलबाग चौक
- बाजीराव रस्ता : पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक
- गणेश रस्ता : फडके हौद चौक ते जिजामाता चौक
- केळकर रस्ता : आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याती मागणी
Pune Bandh LIVE : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यात यावं ही यातील प्रमुख मागणी आहे. बंदच्या निमित्ताने शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. लाल महालाजवळ जाहीर सभेने मोर्चाचा समारोप होणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #MaharashtraBandh #Bandh pic.twitter.com/yoNaOGbYy4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
Pune Bandh LIVE : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी 7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.