Baramati Firing : बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर फायरिंग झाल्याने खळबळ. गोळीबारात एक तरुण जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल. दुचाकीवरुन आलेल्या इसमांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल.
Buldhana Car Accident: पत्नीला कार शिकवताना कार विहिरीत पडून पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडलीये. देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे आपली पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते. स्वाती आणि सिद्धी यांचा मृतदेह शोधण्यात येत असून अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल.
Ajit Pawar on State Projects : राज्यातले प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल अजित पवार मोठा गौप्यस्फोट करणार? उद्योग कसे बाहेर गेले, याची सविस्तर माहिती असल्याचा अजित पवारांचा दावा. शिर्डीच्या धिवेशनात सगळं सांगणार - अजित पवार
Beed Election : बीडच्या पांगरी येथील गोपीनाथ गड सेवा समितीच्या निवडणुकीतही धनंजय मुंडे गटाचं वर्चस्व. आमदार धनंजय मुंडे यांच्या गटानं 13 पैकी 13 जागा जिंकत पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. 30 वर्षांचा गड उद्ध्वस्त, निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष.
Fadanvis in Pandharpur: कार्तिकी एकादशी महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल. उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशी महापूजेचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळालाय. यावेळी फडणवीसांनी वारकऱ्यांशी संवाद साधला, फडणवीसांनी वारकऱ्यांसोबत घातली फुगडी, टाळ-मृदुंगावर घरला ठेका. पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या लांबच लांब रांगा लागू नयेत, भाविकांना तातडीनं दर्शन मिळायला हवं यासाठी आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय.
Sushma Andhare on Shirsat: शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. शिंदे गटात जाऊन संजय शिरसाट यांना पश्चाताप झाल्याचं वक्तव्यही सुषमा अंधारे यांनी केलंय. तर दुसरीकडं संजय शिरसाट यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. मंत्रिपदाबाबत शिंदे-फडणवीस निर्णय घेतील - संजय शिरसाट
Firing at Imran Khan Rally : सिंधच्या गुजरावाला येथे इमरान खान यांच्या रॅलीवर गोळीबार, इमरान खान यांच्या पायाला दुखापत, इमरान खानसह 5 जण जखमी, गोळीबारात एकाचा मृत्यू, सर्व जखमींना रुग्णालयात हलवलं, गोळीबार करणारे 2 हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात, त्यातल्या एका हल्लेखोराला गोळी घालून ठार केलं.
Bacchu Kadu & Ravi Rana Conflicts :रवी राणांना आज प्रत्यक्ष भेटून वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसंच जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊ असं म्हणत कडूंनी समेटाची भाषा केलीय. नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या मग भाजपमध्ये गेल्या, मग राणांनी पैसे घेतले असं आम्ही म्हणायचं का, असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडू मुख्य्मंत्री शिंदे आणि उपमुख्य्मंत्री फडणवीसांची घेणार भेट. मला वाद करायचा नाही, जास्त गोंधळ निर्माण करायचा नाही-बच्चू कडू.
Chitra Wagh BJP's women state president: चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, महाविकास आघाडीच्या महिलांना चित्राताई भाजपमध्ये आणतील - बावनकुळेंना विश्वास. चित्रा वाघ सोमवारपासून राज्याचा दौरा करणार.
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये आता सामान्य जनता थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकणार नाहीय. सुरुवातीला सर्वसामान्य जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आता मात्र जनतेला दोन हात लांब ठेवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयातील कार्यालयात VVIP, आमदार, खासदार सोडून जनता, पत्रकार यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली दिसून येत आहे. मंत्रालयात सामान्य माणसाची निवेदने स्वीकारण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तळ मजल्यावर टपाल कक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे.
ED on Pratap Sarnaik : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांना ईडीनं दणका दिलाय. सरनाईकांची 11 कोटींची मालमत्ता ईडी जप्त करणार आहे. ठाण्यातले दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधला एक फ्लॅट ईडी ताब्यात घेणार आहे. एनएसईल घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. पण याविरोधात अपिल करण्याची मुभा सरनाईकांना देण्यात आलीय. ईडीच्या कारवाईला कंटाळून सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. भाजपसोबत जुळवून घ्या असा सल्ला त्यांनी या पत्रातून दिला होता. त्यानंतर मग उद्धव ठाकरेंना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. पण आता ही कारवाई करत ईडीने प्रताप सरनाईकांना दणका दिल्याचं बोललं जातंय.
Gujrat Assembly Election Dates : गुजरात विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्यात गुजरातमध्ये 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला गुजरात विधानसभेसाठी मतमोजणी होणार आहे.
Mumbai Airport Foreign Currnecy Seized : मुंबई विमानतळावरुन तब्बल 4 कोटी रुपये किंमतीच्या परदेशी नोटा जप्त करण्यात आल्यात. कस्टम विभागानं ही कारवाई केलीय. दुबईला निघालेल्या तीन प्रवाशांना कस्टम विभागानं तपासणीसाठी थांबवलं होतं. त्यांच्या सामानाच्या झडतीत ही भली मोठी रक्कम सापडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
HEARING ON MASHAL SYMBOL : दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिलाय. मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. समता पार्टीने दोन जजेसच्या बेंचकडे ही रिट याचिका केली होती. ठाकरे गटाला मशाल चिन्हं न देण्याची विनंती समता पार्टीने केली होती. याआधी सिंगल जज बेंचने ही याचिका फेटाळल्यावर समता पार्टीन डबल जज बेंचकडे याचिका केली होती. आता डबल जज बेंचनेही याचिका फेटाळल्यामुळे मशाल चिन्हं ठाकरे गटाचंच यावर शिक्कामोर्तब झालंय. समता पार्टीने आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय.
Pune NCP Protest : पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झालीय. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू आहे. पोलीस भरती आणि उद्योगांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झालीय.
Bacchu Kadu & Ravi Rana Conflicts : अमरावतीमधला बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद काही मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता थेट घरात घुसून मारण्याच्या रवी राणांच्या धमकीवरुन दोघांमधला वाद पुन्हा पेटलाय. त्यामुळेच नाराज बच्चू कडू आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रवी राणांच्या वक्तव्यानं बच्चू कडू नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे आता कडूंच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा मध्यस्थी करणार का आणि हा वाद कायमचा मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
SSC HSC Attendance : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलीय. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलीय. सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आलेत. पुढील वर्षी 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या तर 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde Buldhana Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेलदार समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. कान्हू सती मातेच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्या म्हणजे खेडी पान्हेरा इथल्या बेलदार समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.
Good News For Sugar Factories : साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. इथेनॉलच्या खरेदी दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ करण्यात आलीय. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सध्या 63.45 रुपये प्रति लिटरचा दर मिळत होता. तो आता 65.60 रुपये इतका असेल. सी हेवी मोलॉसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला 46.66 रुपये प्रति लिटर दर मिळत होता, तो आता 49.40 रुपये इतका असेल. हे नवे दर डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.
Good News For Industrialist : नवी मुंबईतल्या टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया आणि अंबरनाथ एमआयडीसीत भूखंड वाटपावरील बंदी राज्य सरकारने उठवली आहे. एकामागोमाग एक प्रकल्प राज्याबाहेर जात असताना आता राज्य सरकारने हा निर्णय घेत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केलाय. यामुळे या भागात येऊ घातलेल्या उद्योगांना दिलासा मिळाला आहे. राज्यातल्या सर्व औद्योगिक वसाहतीत भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली असली तरी टीटीसी आणि अंबरनाथ परिसरात भूखंड वाटपाला दिलेली स्थगिती कायम ठेवली होती. त्यामुळे उद्योग जगतात नाराजी होती.त्यामुळे विरोधकांकडून टिकेची तोफ डागली जात होती. त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता होती. विरोधाची धार कमी करण्यासाठी उद्योग विभागाने अखेर 31 ऑक्टोबरला टीटीसी आणि अंबरनाथ क्षेत्रातील भूखंड वाटप स्थगिती उठवलीय.
Election Commission Press Conference : केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा या पत्रकार परिषदेत होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होतील असा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
HEARING ON MASHAL SYMBOL : मशाल चिन्हावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. समता पार्टीनं दोन बेंच जजेसकडे अपील केलंय. याचिकेत उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह न देण्याची मागणी समता पार्टीनं केलीय. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं समता पार्टीची याचिका फेटाळली होती.
Nationalist Congress Party Adhiveshan : राष्ट्रवादी काँग्रेसचं उद्यापासून शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. रूग्णालयातून कालच डिस्चार्ज मिळालेले शरद पवार आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे किमान 40 महत्त्वाचे नेते या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस विविध विषयांवर मंथन करणार आहे. ओला दुष्काळ, कर्ज, परराज्यात जाणारे प्रकल्प अशा विविध विषयांवर या अधिवेशनात चर्चा होईल.
Andheri Bypoll Election : मुंबईतल्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक आज होतेय. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात अपक्ष मिलिंद कांबळेंसह सात अपक्ष रिंगणात आहेत. मतदानासाठी 1 हजार 600 कर्मचारी आणि 1 हजार पोलीस तैनात करण्यात आलेत. तर 2 लाख 71 हजार मतदार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.