Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Political News Live: मुख्यमंत्री शिंदे शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Political News: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, बातम्यांचे वेगवान Live अपडेट्स   

Maharashtra Political News Live: मुख्यमंत्री शिंदे शरद पवारांच्या भेटीला
LIVE Blog
04 November 2022
04 November 2022 20:36 PM

Chief Minister Shinde meets Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती चांगली असल्याचं पवारांनी सांगितल्याची माहिती शिंदेंनी दिली. तसंच शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला पवार उपस्थित राहणार असून तिथून परत आल्यानंतर पुन्हा रुग्णालयात उपचार घेणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या 5 दिवसांपासून पवारांवर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

 

04 November 2022 20:14 PM

Aditya Thackeray's Meeting: आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली. आदित्य ठाकरेंची सिल्लोडमध्ये सभा होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. सभेसाठी ठाकरे गटानं अर्ज केला होता. मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे आता केवळ शेतक-यांसोबत संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. तर आपण कोणत्याही राजकीय संभेचं आयोजन केलेलं नव्हतं असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. मात्र गर्दी जमणार नसल्यामुळेच सभा रद्द केल्याचा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावलाय. 

04 November 2022 19:39 PM

Chief Minister Shinde meets Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शरद पवारांची भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात घेणार भेट. ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या 5 दिवसांपासून शरद पवारांवर उपचार सुरू.

04 November 2022 19:24 PM

Thackeray Group Sushma Andhare: सुषमा अंधारेंच्या सभेवरून राजकारण तापलं. पोलिसांनी सुषमा अंधारेंची गाडी अडवली, पोलिसांचा गाडी पुढे जाऊ देण्यास अटकाव. नजरकैदेपेक्षा भयंकर स्थिती असल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. मुक्ताईनगर येथे अंधारेंच्या महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारली. सभा घेण्यावर सुषमा अंधारे ठाम.

04 November 2022 19:10 PM

Thackeray Group Sushma Andhare: नजरकैदेपेक्षा भयंकर स्थिती असल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. मुक्ताईनगर येथे अंधारेंच्या महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारली. सभा घेण्यावर सुषमा अंधारे ठाम. मी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही - सुषमा अंधारे. जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं.

 

04 November 2022 17:51 PM

Jalgaon Thackeray Group leaders arrested: सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेवरून जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले. प्रशासनाने मुक्ताईनगर येथील महाप्रबोधनसभेला परवानगी नाकारल्यावरही मुक्ताईनगरमध्ये सभा घेण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आयोजकांना मुक्ताईनगर पोलिसांनी घेतलं ताब्यात. सभा घेण्यासाठी आक्रमक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड.

04 November 2022 17:25 PM

Aditya Thackeray's meeting allowed: संभाजीनगरमधल्या सिल्लोड शहरातील आदित्य ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी. मात्र महावीर चौक ऐवजी आंबेडकर चौकाच्या बाह्य रस्त्यावर आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी. तर दुसरीकडे नगरपालिकेच्या शाळा मैदानावर श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी दिलेली आहे.

04 November 2022 16:59 PM

Jayant Patil-Ajit Pawar on State Govt.: राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही, शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असं भाकित राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि अजित पवार यांनी केलंय. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असं ते म्हणालेत. तर 145 चा आकडा कमी झाला की सरकार पडणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलंय.

04 November 2022 16:24 PM

SSC, HSC Exam Application: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, दहावी, बारावी परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर. बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर. 

04 November 2022 16:12 PM

Amritsar Sena Leader Killed: अमृतसरमध्ये भररस्त्यात शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या. सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या. मंदिराबाहेर आंदोलन करत असताना सुरींवर गोळीबार, अमृतसरमध्ये गोपाल मंदिर येथील घटना.

04 November 2022 14:11 PM

Sushma Andhare today’s meeting banned  : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये होणाऱ्या सुषमा अंधारेंच्या आजच्या सभेवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने खळबळ उडाली. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंची सभा होणार होती. ज्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांनाही त्याचा फटका बसला आहे. कारण पाटलांच्या महाआरती कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

04 November 2022 13:10 PM

Nagpur Pension Scam :  नागपूर जिल्हा परिषदेत मोठा पेन्शन घोटाळा उघड झाला आहे. महिला कनिष्ठ लिपिकानं हा घोटाळा केला आहे. पारशिवानी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात हा घोटाळा झाला आहे. मृत पेन्शन धारकांना जिवंत दाखवत त्यांचं पेन्शन या महिला लिपिकानं तिच्या परिचयाच्या व्यक्तींच्या नावानं उचलल्याचं उघड झाला आहे. त्यानंतर घोटाळेबाज महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी 3 सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. 

04 November 2022 12:31 PM

Vinayak Raut on Narayan Rane  सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे, बैठक कोण चालवतंय ?, असा सवाल विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला आहे. 

04 November 2022 11:45 AM

Whatsapp Video Call : व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचर्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता व्हिडिओ कॉलवर एकाच वेळी 32 जण जॉईन होऊ शकणार आहेत. तर आता ग्रुपची सदस्य संख्याही वाढवण्यात आली आहे. आता एका ग्रुपमध्ये 1,024 जण जोडले जाऊ शकतात. आधी ग्रुपची ही मर्यादा 512 इतकीच होती. मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी या भन्नाट फिचर्सची घोषणा केली आहे. सध्या विविध झोनमध्ये त्याच्या चाचण्या सुरु आहेत.

04 November 2022 10:38 AM

Twitter Cost Cutting : ट्विटरमधून अखेर कर्मचारी कपात करण्याची सुरुवात झाली आहे. एलन मस्क ट्विटरमधून निम्मे कर्मचारी हटवणार आहेत. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आलीय. ट्विटरमध्ये जवळपास साडे सात हजार कर्मचारी आहेत, त्यातले निम्मे म्हणजे जवळपास 3,738 कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार आहे. नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी मेल पाठवणार आहे. ट्विटरसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींवर याचा परिणाम होईल, मात्र कंपनीच्या हिताकरीता हे दुर्दैवी पाऊल उचलावं लागत आहे असा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आलाय. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर लगेच कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. कुठूनही काम करण्याच्या पॉलिसीतही बदल केला जाणार आहे.

04 November 2022 10:30 AM

Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन हा वाद सुरु झाला. कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ घालत पोलिसांसोबत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी अखेर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. याआधीसुद्धा बांगर सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणे यावरुन वादात अडकलेत.

04 November 2022 09:38 AM

Western Railway : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशारानं सुरु आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

04 November 2022 09:34 AM

JJ Hospital : मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या परिसरात ऐतिहासिक भुयार सापडलंय. जेजेची डी.एम. पेटिट ही 130 वर्ष जुनी इमारत आहे, जिथे सध्या नर्सिंग कॉलेज आहे. त्या इमारतीत हे भुयार आढळलंय. हे भुयार 130 वर्ष जुनं असून 200 मीटर लांब आहे. डी.एम.पेटिट ते मुटलीबाई इमारत असं 200 मीटर लांबीचं हे भुयार असून ते तीन भागांमध्ये विभागल्याचं दिसून आलं आहे. जे. जे. रुग्णालय 1854 मध्ये रुग्णांसाठी खुलं करण्यात आलं आहे. जेजेचे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाहणी करताना हे भुयार आढळून आलं आहे. दरम्यान भुयाराची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे.

04 November 2022 07:37 AM

Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशी  निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विठुरायाकडे साकडं

Read More