Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Republic Day 2023 LIVE Updates : 74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद

Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. प्रजासत्ताक दिनाचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या LIVE ब्लॉगशी कनेक्ट राहा.

Republic Day 2023 LIVE Updates : 74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद
LIVE Blog

Republic Day 26 January : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. प्रजासत्ताक दिनाचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या LIVE ब्लॉगशी कनेक्ट राहा.

26 January 2023
26 January 2023 13:16 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आकर्षण

- प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण, 'साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर' संकल्पनेवर  आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली सगळ्यांचीच मनं. 

- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर नारी शक्तीचं दर्शन...बीएसएफच्या महिला उंट सवार टीमसह विविध राज्यांच्या चित्ररथांनीही केला स्त्री-शक्तीचा जागर 

- कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये इजिप्तच्या सैनिकांच्या तुकडीचाही समावेश. 144 सैनिकांचं संचलन, कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फत्ताह एल खारासावी यांनी केलं तुकडीचं नेतृत्त्व.. 

- काश्मीरच्या लालचौकातही फडकवला तिरंगा. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त.. 

- 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन...४४ विमानांचा फ्लायपास्ट 

26 January 2023 13:08 PM

74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद

Republic Day 2023 LIVE Updates : देश आज अत्यंत उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. सालाबादप्रमाणे कर्तव्य पथवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सैन्यदलांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. इजिप्तच्या सैन्यदलांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मनं जिंकली. 

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रथमच परदेशी सैन्यदलांचं पथक सहभागी झालं. संचलनाची सुरुवात मेकनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटने केली. भारतीय सैन्यदलाचे विविध रणगाडे, चिलखती वाहनं, के 9वज्र सारख्या तोफा, आकाश सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम सहभागी झाले. लष्कराच्या इन्फन्ट्री रेजिमेंटच्या पंजाब, मराठा लाईट इन्फन्ट्री, बिहार या रेजिमेंट, वाय़ुदल, नौदलाच्या पथकांनी शानदार संचलन केलं. 

संपूर्ण सोहळ्यात मेड इन इंडिया हा मंत्र होता. संपूर्ण सोहळ्यात केवळ भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र सादर करण्यात आली. यावर्षी संपूर्ण सोहळ्यावर नारीशक्तीचा प्रभाव होता. वायुदल, नौदलाच्या पथकांचं प्रमुखपद महिला अधिका-यांकडे होतं. सीआरपीएफचं संपर्ण महिलांचं पथक होतं. तर दिल्ली पोलिसांचं संपूर्ण महिलांचं बँड पथक होतं. विविध राज्याच्या चित्ररथाद्वारेही महिलाशक्तीचा जागर करण्यात आला. 

26 January 2023 11:54 AM

विविध राज्यांच्या रथांचे संचलन

Republic Day 2023 LIVE Updates : 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या झांकीमध्ये 'नारी शक्ती'चा रथ आकर्षण ठरला होता. तर हरियाणाची झांकी भगवद्गीतेवर आधारित रथ साकारण्यात आला होता. महाभारताच्या युद्धातील विविध दृश्ये दाखवण्यात आलीत. 

26 January 2023 10:50 AM

कर्तव्य पथावर देशाचा तिरंगा फडकवला

Republic Day 2023 : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर तिरंगा फडकवण्यात आला. प्रथमच देशी बनावटीच्या 105 फील्ड गनमधून सलामी देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना अभिवादन केले. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले. पंतप्रधान मोदींनी येथे शहीद जवानांना अभिवादन केले.

26 January 2023 10:09 AM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन 

Republic Day 2023 : 74 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कर्तव्य पथवर भारताच्या सामर्थ्याचं शानदार संचलन करण्यात आले.  देशभरात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याची थिम जन भागीदारी अशी ठरवण्यात आली आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत. काल त्यांचं भारतात आगमन झालं. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सैन्यदलांचं संचलन... सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विजय चौकातून हे संचलन सुरू झाले. यावर्षी प्रथमच इजिप्त सैन्यदलांचं संयुक्त पथक प्रजासत्ताक दिन सोहळ्यात संचलन करत आहे.

26 January 2023 09:56 AM

'झी समूहा'च्या मुख्य कार्यालयातही प्रजासत्ताक दिन उत्साहात

Republic Day 2023 : मुंबईतील 'झी समूहा'च्या मुख्य कार्यालयातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजता झीच्या मुख्यालयात झी समूहाचे व्यवस्थापन प्रमुख श्रीराम कुंभारे यांनी ध्वज फडकावून सलामी दिली. यावेळी 'झी समूहा'च्या इमारतीचा सुरक्षा वृंद. 'झी समूहा'तील विविध कंपन्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

fallbacks

26 January 2023 09:47 AM

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन 

Republic Day 2023 : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. मुंबईतील शिवाजी पार्क इथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राज्य सरकारच्या विविध 16 विभागांमार्फत चित्ररथ सादर करण्यात येत आहेत. शिवाजी पार्क इथे विविध विभागांकडून वैशिष्ट्यपूर्ण परेड झाली.

26 January 2023 09:07 AM

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा  

Republic Day 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केलेय, 'प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. यावेळी हा प्रसंग देखील खास आहे. कारण आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान साजरा करत आहोत. देशाच्या थोर स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार व्हावीत, एकजुटीने पुढे जावे, हीच आमची इच्छा. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

26 January 2023 08:03 AM

प्रजासत्ताक दिनाच्या वाळूशिल्प साकारुन शुभेच्छा
Republic Day 2023 : भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पाद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. चित्रकार रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प वेंगुर्ला येथील सागरतीर्थ किनाऱ्यावर साकारले आहे. वाळू आणि रंगोळी वापरुन त्यात महापुरुषांचे कोरलेले चित्र आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

fallbacks

26 January 2023 07:48 AM

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची सजावट
Republic Day Live Updates : आज भारतीय स्वातंत्र्याचा 74 प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा होत आहे. याच माध्यमातून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही तिरंगा रंगाची सजावट शेकडो टन फुले वापरून केलेली आहे पुण्यातील श्री विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुंदर अशी सजावट केलेली आहे. यामुळे संपूर्ण विठ्ठलाने रुक्मिणी मंदिर हे तिरंगामध्ये झाल्याचे या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे.

fallbacks

26 January 2023 07:30 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक  

Republic Day Live Updates:प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात आहे. देश आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे  आज कर्तव्याच्या वाटेवर देशाच्या ताकदीची झलक पाहायला मिळणार आहे. कर्तव्य पथवर परेड काढण्यात येईल.

26 January 2023 07:29 AM

व्हीव्हीआयपी पहिल्या रांगेत नसतील, असे पहिल्यांदाच घडणार 

Republic Day Live Updates  : भारत आज 26 जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा यावेळी अनेक प्रकारे वेगळा आहे. पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड कर्तव्य मार्गावरून जाणार आहे. पूर्वी ते राजपथ म्हणून ओळखले जात असे. परेड पाहण्यासाठी व्हीव्हीआयपी पहिल्या रांगेत नसतील, असे पहिल्यांदाच घडणार आहे. यावेळी पहिल्या रांगेत रिक्षाचालक, कर्तव्यदक्ष मार्ग बांधणारे मजूर आणि त्यांचे नातेवाईक बसतील, ज्यांना श्रमजीवी असे नाव देण्यात आले आहे. अग्निवीर प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्याच्या मार्गावर राष्ट्रध्वज फडकवतील. पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात परेडची सलामी घेणार आहेत.

26 January 2023 07:24 AM

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी कर्तव्य पथवर ध्वजवंदन करतील

Republic Day Live Updates : देश आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी कर्तव्य पथवर ध्वजवंदन करतील. यावर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याची थिम जन भागीदारी अशी ठरवण्यात आलीय. सकाळी साडेसात वाजता राष्ट्रपती ध्वजवंदन करतील. त्यानंतर राष्ट्रगीत गायन होईल. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत. काल त्यांचं भारतात आगमन झालं. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सैन्यदलांचं संचलन... सकाळी १० वाजता नवी दिल्लीतल्या विजय चौकातून हे संचलन सुरू होणार आहे. य़ावर्षी प्रथमच इजिप्त सैन्यदलांचं संयुक्त पथक प्रजासत्ताक दिन सोहळ्यात संचलन करणार आहे. 'झी 24तास'वर आपण या सोहळ्याची प्रत्येक बातमी पाहू शकाल.

संचलनात प्रथमच नारीशक्तीची झलक पहायला मिळेल. बीएसएफची पहिली महिला तुकडी यावर्षी उंट सवारी करेल. वायुदल आणि नौदलाच्या पथकाची कमांड महिला अधिकारीच सांभाळेल. सैन्यदलांचं संचलन विजय चौकातून कर्तव्यपथावरून लालकिल्ल्यापर्यंत केलं जाईल. विविध राज्यांच्या चित्ररथांद्वारे संस्कृती आणि कलादर्शन कर्तव्यपथावर सादर केलं जाईल. महाराष्ट्राचा चित्ररथही यावर्षी आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथात स्त्रीशक्तीचा जागर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातली तीन शक्तिपीठं यावर्षी सादर केली जाणार आहेत. 

Read More