MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, शेलार, नार्वेकर आणि आव्हाडांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, एमसीए अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता.
Congress Leader Meet Uddhav Thackeray : काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाई जगताप मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार भेट, काँग्रेसचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा.
Sanjay Raut Exclusive on Shivsena Symbol : नवे चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, खासदार संजय राऊतांची 'झी २४ तास'ला प्रतिक्रिया, नावात काय?...नाव गोठवलं तरी शिवसेना तीच असल्याची संजय राऊतांची 'झी २४ तास'ला प्रतिक्रिया, शिंदेंविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप असल्याचं खासदार संजय राऊतांचं वक्तव्य
Shinde Camp In Election Commission : शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 3 चिन्हांचा प्रस्ताव सादर केल्याची सूत्रांची माहिती, त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर केल्याची सूत्रांची माहिती, त्रिशूळ, उगवत्या सूर्यावर शिंदेंचाही दावा
Shivsena Election Symbol Freeze : ठाकरे गट निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हायकोर्टात जाणार, दिल्ली हायकोर्टात आज रिट याचिका दाखल करणार, चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवल्यानं ठाकरे गट दिल्ली हायकोर्टात, ठाकरे गटाला युक्तिवाद करण्यास संधी न दिल्याचा दावा.
Mulayam Singh Yadav Passed Away : समाजवादी पार्टीचे मुलायम सिंह यादवांचं वयाच्या 82व्या वर्षी गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन.
Sanjay Raut : संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपणार, न्यायालयीन कोठडी आणि जामिनावर आज विशेष पीएमएलए कोर्टात होणार सुनावणी.
Aadhar Card Updation : आधार कार्डाला 10 वर्षांनी अपडेट करावं लागणार, पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यात मोहीम सुरू, पत्त्यात बदल झाला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार.
Marathi Sign Board Compulsary : दुकानांवर मराठी पाट्या न लावलेल्यांवर कारवाई, मराठी पाट्या न लावलेल्यांना 7 दिवसांची नोटीस देणार, मराठी पाट्या लावण्यासाठी व्यापाऱ्यांना हवीय मुदतवाढ.
IMD Rain Alert : राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढला, 14 ऑक्टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, राज्यात परतीचा पाऊस अद्याप दाखल नाही.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.