Marathi News> विधानसभा २०१४
Advertisement

नागपुरात लवचिक चोराचे कारनामे CCTV मध्ये कैद; पोलिसही चक्रावले

सराईत चोरट्याची लवचिकता पाहून अनेकजण चक्रावले

नागपुरात लवचिक चोराचे कारनामे CCTV मध्ये कैद; पोलिसही चक्रावले

अमर काणे, झी 24 तास नागपूर : नागपूरमध्ये सध्या एका लवचिक चोराची बरीच चर्चा आहे. अगदी निमुळत्या जागेतून जात या चोराने वाईन शॉपीमध्ये चोरी केली...आणि तिथून जवळपास 4 लाखांची रक्कम चोरली. यामध्ये सुमारे साडेतीन लाखाची चिल्लर चोरली आहे. बघूया, या लवचिक चोराची चिल्लर कथा.

 हा आहे अट्टल चोरटा राजा शेख. नागपुरात गेल्या पंधरा दिवसात त्याने हुडकेश्वर, वाठोडा इथे अनेक वाईन शॉप आणि बारमध्ये चोरी केल्याचं उघडकीस आल आहे. या सराईत चोरट्याची लवचिकता पाहून अनेकजण चक्रावले

सहा जूनला रमाश्री बियर शॉपीमध्ये ज्या निमुळत्या जागेतून पैसे देऊन ग्राहक बियरची बाटली घेतात, त्या निमुळत्या जागेतून हा चोरटा आत घुसला आणि चोरी केली.ही त्याची चोरी cctv चित्रित झाले होते. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो 13 तारखेला जामिनावर बाहेर आला.. त्यानंतर 16 तारखेला या लवचिक चोराने पुन्हा एकदा एका वाईन शॉपीलाच टार्गेट केल आहे. 

हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत दिघोरी चौकाजवळ असलेल्या वर्षा वाईनचे शटर वाकवून आणि पुन्हा लवचिकता दाखवत तो वाईन शॉप मध्ये घुसला. या चोरट्याने तिथून 4 लाख 87 हजारची रक्कम चोरी केली. महत्त्वाचं म्हणजे या चोरीत त्याने सुमारे साडेतीन लाख रुपयांचे - चिल्लर नाणेही चोरले आहेत. त्याकरता त्याने वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्यांमधून हे सुट्टे नाणे पाच ते सहा वेळा त्या वाईन शॉपमधून बाहेर काढले आणि मग ते एका पोत्यात भरून इ- रिक्षामध्ये ठेवत आपल्या सहकार्यासोबत पळ काढला. हा चोरटा चोरी करताना आणि चिल्लर नाण्यांच्या पिशव्या एका बादलीत घेऊन जातानाच सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झाले आहे..या चोरामुळे पोलिस हैराण झालेत.

या लवचिक चोराने चोरलेले हे चिल्लर नाणे पाच --दहा आणि वीस रुपयांचे होते. महत्त्वाचा म्हणजे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मुद्देमाल जप्त केला. त्यावेळी हे चिल्लर नाणे जप्त केल्यानंतर ते पोते उचलायला दोन -तीन पोलीस कर्मचारी लागलेत. लवचिक चोराच्या या जड चिल्लर चोरीमुळे पुन्हा तो चर्चेत आला आहे. 

 चोरी करून पळून जाण्यासाठी चोर कमालीचे चपळ असतात...मात्र चोर राजा शेखची लवचिकता पाहून सगळेच अवाक झाले.राजाच्या रबरासारख्या या शारिरीक लवचिकतेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Read More