Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज्यात आज १०,४२५ रुग्ण वाढले, तर १२,३०० रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 7 लाखांवर

राज्यात आज १०,४२५ रुग्ण वाढले, तर १२,३०० रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : आज राज्यात गेल्या २४ तासात १०,४२५ रुग्ण वाढले आहेत. तर ३२९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण १२,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ५,१४,७९० जण बरे झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७३.१४ टक्के झालं असून मृत्यूदर ३.२४ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ३७,२४,९११ जणांची टेस्ट झाली असून त्यातील ७,०३,८२३ (१८.८९ टक्के ) जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

सध्या राज्यात १२,५३,२७३ जण होमक्वारंटाईन आहेत. तर ३३,६६८ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात कोरोनाचे १,६५,९२१ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ७,०३,८२३ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ३२९ मृत्यूंपैकी २४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

Read More