Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दगडूशेठ गणपतीला १२६ किलोचा सोन्याचा वर्ख असलेला मोदक

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक तयार करण्यात आला आहे. पुण्यातील काका हलवाईने एका भक्तांच्या मागणीनुसार हा प्रचंड मोदक तयार केला आहे. पूर्णपणे माव्यात तयार करण्यात आलेल्या या मोदकाला सुका मेवा आणि चांदीचा वर्ख लावून सजवण्यात आलं आहे. 

दगडूशेठ गणपतीला १२६ किलोचा सोन्याचा वर्ख असलेला मोदक

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक तयार करण्यात आला आहे. पुण्यातील काका हलवाईने एका भक्तांच्या मागणीनुसार हा प्रचंड मोदक तयार केला आहे. पूर्णपणे माव्यात तयार करण्यात आलेल्या या मोदकाला सुका मेवा आणि चांदीचा वर्ख लावून सजवण्यात आलं आहे. 

या मोदकावर ठेवलेला सोन्याचा वर्ख असेलला सव्वा किलोचा मोदक देखील सध्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला यंदा १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा मोदक बाप्पाला वाहण्यात येणार आहे. त्यानंतर तो भक्तांमध़्ये वाटला जाईल.

Read More