Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावली; जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली

पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावण्यात आली आहे. 

 पुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावली; जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली

Pune Govind Ranade Trust : पुण्यातील महादेव गोविंद रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन फसवणूक करून बळकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सर्वंट्स सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद भगवंत देशमुख यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्ररकरणी पोलिस ठाम्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

म गो रानडे ट्रस्टची शेवाळवाडी मध्ये 16 एकर जमीन आहे. हा ट्रस्ट सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडियाशी संलग्न आहे. सर्व्हंटस् सोसायटी ऑफ इंडिया चे सचिव मिलिंद देशमुख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. याप्रकरणी ट्रस्टच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Read More