Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगाबादसाठी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी

औरंगाबादसाठी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. औरंगाबाद शहरासाठी प्रस्तावित पाणी योजना राज्य सरकारने मंजूर केली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार आता औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटणार आहे.औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना राज्य सरकारने मंजूर करण्यात आली आहे.

यात जायकवाडी पासून शहरापर्यंत पाईप लाईन आणि शहर अंतर्गत पाईप लाईनचाही समावेश असणार आहे. सध्या औरंगाबादला 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ही योजना पूर्ण झाल्यावर रोज पाणी मिळू शकणार आहे.

Read More