Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नदीपात्रात उडी घेतलेल्या माय-लेकींचा मृतदेह सापडला

आईची 2 लेकींसह आत्महत्या

नदीपात्रात उडी घेतलेल्या माय-लेकींचा मृतदेह सापडला

नांदेड : दोन चिमुकल्या मुलींसह गोदावरी नदीपात्रात उडी घेतलेल्या माय लेकीचा मृतदेह सापडला आहे. दोन लहानग्या मुलींसस महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी इथली ही घटना आहे. पूजा कांबळे या 35 वर्षीय महिलेने आपल्या 3 वर्षीय सुविद्या आणि 5 वर्षीय शिवाणी यांच्यासह गोदावरी नादीपात्रात उडी घेतली होती. तात्काळ स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली.

मच्छीमारांच्या मदतीने तात्काळ शोधकार्य सुरु करण्यात आले. पूजा कांबळे ही महिला 6 महिन्यापासून माहेरी होती. कुंडलवाडी येथे सासरी आल्यानंतर तीने हे टोकाचे पाऊल ऊचलले. कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Read More