Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भयानक आणि धक्कादायक ! घर जाळून 20 वर्षीय तरुणीची हत्या

20 year old girl murdered by burning house in Nashik :भयानक आणि धक्कादायक बातमी. इगतपुरीत थरार घटना पाहायला मिळाली.  

भयानक आणि धक्कादायक ! घर जाळून 20 वर्षीय तरुणीची हत्या

नाशिक : 20 year old girl murdered by burning house in Nashik :भयानक आणि धक्कादायक बातमी. इगतपुरीत थरार घटना पाहायला मिळाली. घर जाळून 20 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. पहाटेच्या सुमाराला कातकरी वस्तीतील थराराने नागरिक भयभीत झाले होते.

fallbacks

इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील पहाटे तीन वाजण्याच्या  सुमारास महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. 20 वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. 

तसेच कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकण्यात आली. यामुळे इगतपुरी तालुक्यातील खळबळ माजली आहे. एका टोळक्याकडून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बारशिंगवे या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आला आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Read More