Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साताऱ्यातील कोटेश्वर मंदिरात 246 वर्ष जुना शिलालेख; 'त्या' चार ओळींचा अर्थ काय?

साताऱ्यातील कोटेश्वर मंदिरात 246 वर्ष जुना शिलालेख आढळून आला आहे. देवनागरी भाषेतील हा शिलालेख इतिहासातील अनेक रहस्य उलगडणार आहे.   

 साताऱ्यातील कोटेश्वर मंदिरात 246 वर्ष जुना शिलालेख; 'त्या' चार ओळींचा अर्थ काय?

Satara News :  सातारा जिल्ह्यात अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक  पुरावा सापडला आहे. साताऱ्यात 246 वर्ष जुना शिलालेख सापडला आहे. या शिलालेखाचे अध्ययन सुरु आहे. लवकर याचा उलगडा होणार आहे. हा शिलालेख साताऱ्यातील संग्रहालयात जतन करण्यात येणार आहे. 

साताऱ्यातील कोटेश्वर मंदिरासमोर हा देवनागरी भाषेतील शिलालेख आहे. याची पाहणी करून हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जतन करण्यासाठी आणण्यात आला .हा शिलालेख शके 1779 मधील चार ओळींचा असून, त्याचे अध्ययन सुरू आहे. हा शिलालेख सातारा संग्रहालयातील ‘सातारा इतिहास दालनात’ प्रदर्शित केला जाणार आहे.सातारकरांना इतिहास जतन करण्यासाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठेही दगडी शिलालेख किंवा शिल्प आढळल्यास संग्रहालयाशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.

बदलापुरत शिलालेखाचे  स्मारक साकारले आहे. अश्या प्रकारचे हे महाराष्ट्रातील हे पहिले स्मारक आहे. राज्यात सापडलेले बहुतांश गधेगळ हे मराठीत कोरलेले आहेत तर काही अरबी भाषेत कोरण्यात आले आहेत. गधेगळ सापडणे हि दुर्मिळ बाब असुन असे दुर्मिळ गधेगळ  पाहण्याची संधी बदलापुरकरांना ह्या स्मारकाच्या माध्यमातुन उपलब्ध झाली आहे. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला हा शिलालेख केवळ एक लिखित पुरावाच नाही तर, राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्याकाळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभही आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात यादवकालीन शिलालेख आढळून आला होता. हा शिलालेख इसवी सन 12 व्या शतकातला आहे.. सरस्वती देवीच्या प्रदक्षिणामार्गातील पूर्व भिंतीत देवनागरी लिपीत हा शिलाखेल लिहिला आहे. 2 फूट लांब आणि 1 फूट रुंद असणाऱ्या या शिलालेखात एकूण 16 ओळी आहेत.

 

Read More