Sanjay Sirsat on Viral Video: शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा बेडरुमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयकर विभागाची नोटीस आलेला मंत्री पैशांची बॅग घेऊन हॉटेलमध्ये बसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. एका हॉटेलमध्ये पैशांची बॅग घेऊन मंत्री बसल्याचा व्हिडिओ संजय राऊतांनी समोर आणला. या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजाकरणात खळबळ उडाली आहे. संजय शिरसाटांवर गंभीर केले जात आहे. मला काही फरक पडत नाही... असं बेडरुममधील 'त्या' खळबळजनक व्हिडिओनंतर संजय शिरसाट यांनी एका वाक्यात विषय संपवला. तसेच 5 वर्षात संत्ती 10 पटीने कशी वाढली याचा खुलासा देखील संजय राऊत यांनी केला आहे. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी सर्व आरोपांचे खंडण केले आहे.
संजय शिरसाट एका हॉटेलमध्ये पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय.. पैशांची बॅग असती तर तिथे ठेवली असती का असं संजय शिरसाट म्हणालते. तसेच त्या बॅगमध्ये कपडे आहेत पैसे नाहीत. दाखवण्यात आलेला व्हिडिओ माझ्या घरातील असल्याचा दावाही संजय शिरसाटांनी केलाय. बदनाम करण्याचा कट असल्याचा पलटवार संजय शिरसाटांनी केला. राजकारणातील दलाला अशा प्रकारची कृत्य करत आहेत. आरोप करत आहात तर आरोप सिद्ध करावेत असे चॅलेंज देखील संजय शिरसाट यांनी दिले आहे.
'टू द पॉईंट' या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी सर्व आरोपा फेटाळले आहेत. विट्स हॉटेल 30 वर्षापूर्वी स्थापन झाले. हे हॉटेल काही चालले नाही. यामुळे गुंतवणूकदार भयभित झाले. यामुळे कोर्टाने लिलावाचे टेंडर काढले. माझा धंदा राजकारण नाही. मला काही फरत पडत नाही असं म्हणत सर्व खोटे असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
2019 च्या निवडणुकीत प्रतिपत्र सादर करताना संजय शिरसाट यांची संपत्ती 3 कोटी होती. 5 वर्षात 3 कोटींचे 33 कोटी झाले आहेत. 5 वर्षात संपत्ती 10 पटीने कशी वाढली याचा खुलासा देखील संजय शिरसाठ यांनी केला. एकूण संपत्ती पाहता. मात्र, माझ्यावर 26 कोटींचे लोन आहे. मुंबईत मी 72 व्या मजल्यावर घर घेतले आहे. 1300 कार्पेटचा हा 3 बेडरुमचा फ्लॅट आहे.
मात्र, कर्ज काढून हा फ्लॅट घेतला आहे. कर्जाबद्दल का बोलले जात नाही. पहिला फ्लॅट 2 कोंटीना विकला. नविन फ्लॅट 7.15 कोटींचा आहे. कर्ज काढून हा फ्लॅट घेतला आहे. माझा जन्म चेंबुर लाल डोंगरी परिसरात झाला. मी झोपडीतून बिल्डिंगमध्ये राहण्याचे स्वप्न पाहिले. हे घर घेण्यासाठी मला 42 वर्ष लागली असं देखील संजय शिरसाट म्हणाले. मी 10 वर्ष नगरसेवक
20 वर्ष आमदार आहे.