Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलींचा डबक्यात बुडून मृत्यू

सात ते दहा वयोगटातल्या मुली

पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलींचा डबक्यात बुडून मृत्यू

पनवेल : पनवेलमध्ये डबक्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी २ वजता पोहायला गेल्या होत्या. पनवेल रेल्वे स्थानका शेजारी अंडरपास तयार करण्याचे कान सुरू आहे. यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पाणी साचलेले होते . याच पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. रोहिता येरलाल भोसले, रेशम हल्दीशेठ भोसले आणि प्रतीक्षा परिशान भोसले अशी या मृत मुलींची नावं आहेत. 

तीनही मुली सात ते दहा वयोगटातल्या आहेत. य़ा मुली अमरावतीच्या आहेत. दरवर्षी जत्रा सुरु झाल्यावर ही कुटुंबे येथे येऊन फुगे आणि खेळणी विकतात. आई- वडील कामावर गेल्यानंतर घरात असलेल्या मुली पोहायला गेल्या असता ही दुर्घटना घडली आहे. उशीरा या घटनेची माहिती मिळाल्याने या मुलींना वाचवता आले नाही असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. 

Read More