Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रायगडमध्ये अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

...

रायगडमध्ये अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

रायगड: महडमध्ये वास्तुशांतीच्या जेवणानंतर झालेल्या विषबाधेत ३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.  जेवणानंतर ६० ते ७० जणांना विषबाधा झाली असून, त्यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हवलवण्यात आलंय.

वास्तुशांतीच्या जेवणानंतर झालेल्या विषबाधा

खालापूर तालुक्यातील महडमध्ये माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.  ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आलं.

3 मुलांचा मृत्यू 

विषबाधा झालेल्यांपैकी २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील एम जी एम  रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे 3 मुलांचा मृत्यू झाला.

Read More