Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उच्चभ्रू वस्तीत सफाईसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

सोसायटीची सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्यासाठी एकूण ११ कामगार सफाईचं काम करत होते

उच्चभ्रू वस्तीत सफाईसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : ठाण्यात सोसायटीतला सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय. ढोकाळी नाका परिसरातील प्राईड प्रेसिडेन्सी लुक्सिरिया या उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचं समजतंय. 

सोसायटीची सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्यासाठी एकूण ११ कामगार सफाईचं काम करत होते. सफाईसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर आठ कामगारांना जवळच्याच मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

fallbacks

सिव्हरेज टँकमधल्या विषारी वायूनं तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जणांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलं. 

या आठ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. हे सर्व कामगार मीरा रोड परिसरात राहतात.   

 

Read More