Shivaji Maharaj Rajmudra : पोहचणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील राजमुद्रा आपल्या स्वराज्याची ओळख आहे. प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे आणि पुरातन काळातील मोडी लिपी मध्ये ही राजमुद्रा इतिहासात पहिल्यांदाच प्रतिकृती स्वरूपात केलेली आहे. ही प्रतिकृती आपल्या घरी, कार्यस्थळी, शासकीय व सरकारी कार्यालयात, शाळा - कॉलेज, पार्क - गार्डन अशा अनेक ठिकाणी स्थापित करून याचा आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला तोंड ओळख व्हावी तसेच लुप्त होत चाललेल्या मोडी लिपीला पुनस्मरण करत अनेकांना त्या लिपीचं प्रबोधन व्हावं या हेतूने ही प्रतिकृती करण्यात आलेली आहे.
ही दुहेरी राजमुद्रा आपल्याला लॉकेट, पेंडंट, टेबल टॉप, वॉल हँगिंग, फ्रेम, पेपर वेट अशा अनेक प्रकारे वापरता येऊ शकते. राज ठाकरे यांच्या हस्ते मोडी आणि देवनागरी लिपी केलेली राजमुद्रा याचा अनावरण आणि लोकार्पण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील मूळ राजमुद्रा ही पहिल्यांदा मोडी लिपीत केली आहे MDF, ऍक्रेलिक, धातू अशा विविध माध्यमातून ती लोकांच्या संग्रही प्रत्येकाच्या घरोघरी पोहचावी यासाठी ही प्रतिकृती तयार केली असून एका बाजूस मोडी लिपीत तर पाठीमागच्या बाजूस देवनागरी लिपीत रचली आहे. ही दुहेरी राजमुद्रा आपल्याला लॉकेट, पेंडंट, टेबल टॉप, वॉल हँगिंग, फ्रेम, पेपर वेट अशा अनेक प्रकारे वापरता येऊ शकते.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराठे पाडा इथे उभारण्यात आलंय. याच मंदिरात महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 14 ते 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमाची लगबग सुरू असून कार्यक्रमानिमित्त २५ ते ३० हजार लोकं बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात येतोय.. मंत्र्यांसाठी हेलिपॅडही तयार करण्यात आलंय.