Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बस-ट्रक अपघातात ४० जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर

 बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव बस आणि ट्रक समोरासमोर धडकले यात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

बस-ट्रक अपघातात ४० जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर

औरंगाबाद : हर्सुल जवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव बस आणि ट्रक समोरासमोर धडकले यात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला, तर बसमधील ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ५ प्रवासी गंभीर जखमी आहेत. तर दोन्ही गाड्यांचे चालकही गंभीर जखमी आहेत. जखमीमध्ये दोन लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्व जखमींना उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातानंतर औरंगाबाद जळगाव महामार्गावरची वाहतूक तासभर खोळबंली होती.  मात्र आता सुरळीत झाली आहे.

Read More