Rahuri to Shanishinganapur Railway Route: महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. 494 कोटींचा हा रेल्वे मार्ग आहे. पुणे रेल्वे विभागाकडून राहुरी - शनी शिंगणापूर नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देण्यात आली आहे. तबब्ल 18 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यानचा हा रेल्वे मार्ग आहे. 21.84 किमी नवीन रेल्वेमार्गास मंजुरी मिळाली आहे. यासाठी 494 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, दरवर्षी येणाऱ्या 18 लाखांहून अधिक भाविकांना सोयीचे दळणवळण उपलब्ध होणार आहे. तसेच शिर्डी, नेवासा येथील इतर तीर्थस्थळांनाही फायदा होणार आहे. शनिशिंगणापूर हे महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाण आहे. तेथे नेहमीच भाविकांची रहदारी असते. शनिशिंगणापूर येथे दररोज 45 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात.
राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान रेल्वे मार्ग सुरू झाल्यानं भाविकांची प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर तसेच पैस खांब यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी थेट रेल्वेने पोहोचता येणार आहे. या नविन रेल्वे मार्गामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार या मार्गावर दररोज 4 ट्रेन धावणार आहेत. या मार्गामुळे 18 लाख प्रवासी करतील. हा रेल्वेमार्ग विकास आणि अध्यात्मिक केंद्रांना जोडणारा दिशादर्शक प्रकल्प असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भूप्रदेशात मनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी जिल्ह्यातील 360 हेक्टर क्षेत्र जमीन संपादित करण्यात येणारे याबाबतची केंद्र सूचना गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यानंतर यासाठी संयुक्त मोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. मनमाड मालेगाव धुळे नरडाणा शिरपूर महू मार्गे इंदूर असा हा 309 किलोमीटरचा लांबीचा रेल्वेमार्ग असणारे या मार्गामुळे मुंबई आणि इंदूर या दोन शहरांमधील 830 किलोमीटरचे अंतर 580 किलोमीटरवर येणार आहे. हा मार्ग नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी सर्वाधिक फायद्याचा ठरणार आहे. उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर इंदूर पर्यटन यासाठी जाणाऱ्या तसेच मध्य प्रदेशात कृषीमल पाठवण्यासाठी या रेल्वे मार्गाची मदत होणार आहे.