Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रजासत्ताक दिनी कोकणकड्यावर फडकला 73 फुटांचा तिरंगा

भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररने नवा विक्रम केला आहे.

प्रजासत्ताक दिनी कोकणकड्यावर फडकला 73 फुटांचा तिरंगा

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररने नवा विक्रम केला आहे. त्यांनी हरिश्चंद्रगड गडावरील कोकणकड्यावर 73 फुटी तिरंगा फडकवला आहे. मराठी चित्रपट तारका मीरा जोशी या देखील यावेळी उपस्थित होत्या. 

महाराष्ट्रातील विविध भागातून जवळपास 45 लोकं या मोहिमेत सहभागी झाले होते. 3 दिवसांच्या या ट्रेकिंग मोहिमेत सांधण दरी आणि हरिश्चंद्रगड सर करून 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता 73 फुटांचा तिरंगा फडकवण्यात आला होता.

Read More