Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पतंग उडवताना इमारतीवरुन तोल जाऊन 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नाशिकमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवताना तोल गेल्याने 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. 

पतंग उडवताना इमारतीवरुन तोल जाऊन 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नाशिकमध्ये पतंग उडवताना 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. गणेशनगरमध्ये काठे गल्ली येथे सोमवारी ही दुर्घटना घडली आहे. नक्ष संदीप बनकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. रवींद्र विद्यालयात इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या नक्षचा दुर्दैवी अंत झाला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

मकर संक्रांत जवळ आली की, मुलांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. पंतग उडवण्याच्या नादात मुलं देहभान वि,रुन जातात. आजूबाजूला न पाहता ही मुलं पतंगच्या मागे पळतात किंवा उडवताना आपण किती उंचावर चढलो आहे याकडे दुर्लक्ष करतात. अशाच पद्धतीने नक्ष याचा करुण अंत झाला आहे. 

इमारतीच्या गच्चीवरुन पडून नक्षचा मृत्यू झाला आहे. पतंग उडण्यासाठी नक्ष गच्चीवर गेला असता त्याचा पतंग उडवताना त्याचा तोल गेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

काय काळजी घ्याल? 

प्रत्येक मुलं वेगळं असतं तसंच त्याचं जगणं देखील वेगळं असतं.
पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. 
नकळत्या वयात आपण काय करतो आणि त्याचा काय परिणाम होईल याबाबत मुलं अनभिज्ञ असतात. या वयातच त्यांच्याकडून चुका होता. 
याचा परिणाम इतका खोलवर होतो की, नक्षला आपला जीव गमवावा लागला. 

मुंबई पोलिसांची कारवाई 

नायलॉन मांजा प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नायलॉन मांजाची विक्री अथवा त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजा विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांनी एकूण 19 गुन्हे दाखल केले आहेत. 35 हजारांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे. 

Read More