Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात फिरायला जाता येणार

उन्हाळी सुट्टीसाठी बाहेर जाण्याचे प्लानिंग करत असलेल्यांसाठी एक खूश खबर आहे. महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वे तर्फे या स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. 

महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन;  मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात फिरायला जाता येणार

Summer Special trains from Mumbai, Pune : सर्वच जण आता समर व्हेकेशनच्या टूरचे प्लानिंग करत आहेत. मध्य रेल्वे तर्फे महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन चालवल्या जाणार आहेत. मुंबई, पुण्यातून सुटणाऱ्या या स्पेशल ट्रेनमुळे भारताच्या कानाकोपऱ्यात ट्रीपचे प्लानिंग करता येणार आहे. जाणून घेऊया या समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल. 

उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (CR) त्यांच्या नियमित रेल्वेसह आतापर्यंत एकूण 854 उन्हाळी विशेष रेल्वे चालवणार आहे. यात 278 अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हुजूर साहेब नांदेड ही विशेष रेल्वे चालवण्यात आली आहे. या रेल्वेच्या 356 फेऱ्या असणार आहेत. 

असं आहे समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक

LTT-दानापूर-LTT द्वि-साप्ताहिक विशेष - 50 फेऱ्या

थांबे:  ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
 एलटीटी-मऊ-एलटीटी द्वि-आठवड्यातील विशेष - 48  फेऱ्या
थांबे:  ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, वाराणसी जंक्शन, जौनपूर जंक्शन आणि औंरीहार.

एलटीटी-मऊ-एलटीटी शिक्षक विशेष -  2 फेऱ्या

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, वाराणसी जंक्शन, जौनपूर जंक्शन आणि औंरीहार.

एलटीटी- बनारस-एलटीटी द्विसाप्ताहिक विशेष - 48  फेऱ्या

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छेओकी.

एलटीटी-समस्तीपूर-एलटीटी साप्ताहिक एसी स्पेशल - 24  फेऱ्या

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र जंक्शन, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.

सीएसएमटी - कन्नियाकुमारी - सीएसएमटी साप्ताहिक विशेष - 24 फेऱ्या

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोनावाला, पुणे, दौंड, कुर्दुवाड़ी, सोलापुर, कालाबुरागी, वाडी, कृष्णा (केवल 01005 के लिए), रायचूर, मंत्रालयम रोड, गुंतकल, अनंतपुर, धर्मावरम, येलहंका, कृष्णराजपुरम, बंगारपेट, तिरुपत्तूर,
सेलम, नमक्कल, करूर, दिंडीगुल जंक्शन, कोडाईकनाल रोड, मदुराई जंक्शन, विरुधुनगर जंक्शन, शनिवार, कोविलपट्टी, तिरुनेलवेली, वल्लीयुर आणि नागरकोइल जंक्शन.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हुजूर साहेब नांदेड ही विशेष रेल्वे धावणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ही रेल्वे सुरू होणार असून जून अखेरीपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 101105 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 9 एप्रिल ते 2025  ते 25 जून 2025 पर्यंत दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 12.55 वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहोचेल. या रेल्वेच्या 356 फेऱ्या असणार आहेत. 

 

Read More