Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मंच्युरीयनमध्ये उंदराचं पिल्लू; नवी मुंबईतील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार

नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मंच्युरीयनमध्ये  उंदराचं पिल्लू सापडले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 

मंच्युरीयनमध्ये उंदराचं पिल्लू; नवी मुंबईतील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार

 Dead Rat Found in Manchurian: हॉटेलमधील अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असते. खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. असा आरोप ग्राहकांकडून केला जातो.  नवी मुंबईतील हॉटेलमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार घडला आहे. मंच्युरीयनमध्ये  उंदराचं पिल्लू सापडले आहे. महिला दिनाचे सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या महिलांचा एका ग्रुपला हा धक्कादायक अनुभव आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

हॉटेलच्या जेवणात चक्क उंदीर आढल्याचा प्रकार समोर आल्याने ग्राहक संतापले आहेत. नवी मुंबईच्या ऐरोलीमधील हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला दिनानिमित्त महिलांचा एक ग्रुप ऐरोली येथील पर्पल बटरफ्लाय या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यांनी मच्युरीयन पदार्थामध्ये चक्क उंदराचं पिल्लू आढळले. महिलांनी पर्पल बटरफ्लाय या हॉटेलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

चंद्रपुरात दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त

उन्हाळा लागताच लग्न सराईचे वेध लागले असताना चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरातील सपना डेली नीड्स या दुकानातून चीज अनॅलॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करत असल्याचे लक्षात आल्यावर धाड टाकून 197 किलो साठा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत शहरातील मुख्य गोल बाजार परिसरातील न्यू भाग्यश्री घी भंडार या दुकानातून 275 किलो हाच पदार्थ जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईतील नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Read More