Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

4 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत झाली खिळखिळी, इमारतीतील 16 कुटुंब भीतीच्या छायेखाली

पैठण तालुक्यातील फारोळा गावची ही इमारत असून ही इमारत कोसळू नये म्हणून अशा प्रकारे या इमारतीच्या खांबांना जॅकचा आधार देण्यात आलाय.

4 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत झाली खिळखिळी, इमारतीतील 16 कुटुंब भीतीच्या छायेखाली

विशाल करोळे, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार वर्षांपूर्वी एका बिल्डरने उभा केलेली इमारतचे कॉलम अचानक खिळखिळे झाले. काही कॉलम तुडले असून, इमारत कोसळण्याची शक्यता आहे. 4 वर्षातच इमारत मोडकळीला आल्यानं रहिवासी हतबल झालेत. 

पैठण तालुक्यातील फारोळा गावची ही इमारत असून ही इमारत कोसळू नये म्हणून अशा प्रकारे या इमारतीच्या खांबांना जॅकचा आधार देण्यात आलाय. फारोळा गावातील हरिकुंज सोसायटीच्या सी विंगची ही अशी अवस्था झालीये. बांधकामाच्या अवघ्या 4 वर्षांमध्ये इमारती मोडकळीस आलीये. इमारतीचा खांब कधीही कोसळेल म्हणून त्याला अनेक जॅक लावण्यात आलेत. या एका इमारतीमध्ये एकूण 16 कुटुंब राहतात. यातील काही लोक इमारत कधीही पडेल या भीतीने म्हणून इमारतीच्या मंदिरात जावून राहतायत. इमारत धोकादायक झाल्याने इमारत खाली करण्यासाठी प्रशासनानं रहिवाशांना नोटीस पाठवीलेय. अजून बँकेचे हप्ते शिल्लक असताना इमारतीची ही अवस्था झाल्याने रहिवासी हतबल झालेत.

नाला बुजवून त्याचं सापाटीकरण करून ही इमारत बांधल्याचा आरोप होतोय. इमारतीतील 70 रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन या घरांमध्ये राहतायत. त्यामुळे या नागरिकांची फसवणूक करणा-या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना UBTचे नेते अंबादास दानवेंनी केलीये.

संबंधित बिल्डरने रहिवाशांच्या राहण्यासाठी दुसरी सोय करून देतो असं आश्वासन दिलंय. मात्र बिल्डरने केलेल्या निकृष्ट कामामुळे आणि फसवणुकीमुळे या 16 कुटुंबांचं घर मृत्यूचा सापळा बनलंय. त्यामुळे भविष्यात अशी बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कडक कारवाई करणं गरजेचं आहे.

FAQ : 

रहिवाशांची सध्याची परिस्थिती काय आहे?

इमारत कोसळण्याच्या भीतीने काही रहिवासी इमारतीच्या मंदिरात राहण्यास गेले आहेत. बँकेचे हप्ते बाकी असतानाही इमारतीची ही अवस्था झाल्याने रहिवासी हतबल झाले आहेत.

ही इमारत किती वर्षांपूर्वी बांधली गेली?

ही इमारत चार वर्षांपूर्वी बांधली गेली होती, परंतु अवघ्या चार वर्षांतच ती मोडकळीला आली आहे.

इमारत खराब होण्यामागील कारण काय असू शकते?

नाला बुजवून त्याचे सपाटीकरण करून ही इमारत बांधल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे इमारतीची पायाभरणी कमकुवत झाली असावी.

Read More