Nashik Crime News : सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिककमध्ये एकाच वेळी 350 जणावंर गुन्हा दाखल झाला आहे. थेट फेसबुकने दिली चाइल्ड पॉर्नोग्राफी करणाऱ्यांची माहिती दिली आहे. सायबर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साइट्सद्वारे स्वतःच्या प्रोफाइलवरून प्रसारित केल्याप्रकरणी नाशिकमधील सुमारे 357 नेटिझन्सविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या ''''टिपलाइन'''' मधील माहितीच्या आधारे शहर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. अल्पवयीन मुला-मुलींची अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडीओ समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केल्यास किंवा डाउनलोड केल्यास हे कृत्य चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या प्रकारात - समाविष्ट होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साइट्सवर स्वतःच्या प्रोफाइलवरून नेटिझन्सकडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या कंपनीच्या इंटरनेटचा (आयपी अॅड्रेस) वापर करत 2022-23 या कालावधीत मुलांचे अश्लील व्हिडीओ छायाचित्रे प्रसारित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
याप्रकरणी थेट मेटा कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या नेटिझन्सच्या प्रोफाइलधारकांची माहिती पुरविण्यात आली होती. या माहितीची पडताळणी करत केंद्र सरकारकडून र सरकारकडे ती माहिती पाठविण्यात आली. या माहितीची अंतिमतः छाननी करत टिपलाइन द्वारे प्रत्येक शहरासह ग्रामीण सायबर पोलिसांना आयपी अॅड्रेसनुसार प्रोफाइलधारकांची माहिती देण्यात आली. नाशिक शहर सायबर पोलिसांना प्राप्त झालेल्या पेनड्राइव्हमधील डेटानुसार तीनशेपेक्षा जास्त प्रोफाइलधारकांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे सुभाष ढवळे यांनी दिली.