Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; महाराष्ट्रात कुठे घडला हा प्रकार?

औरंगजेबचा स्टेट्स ठेवणे महागात पडले आहे. सोलापुरमध्ये 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

 औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; महाराष्ट्रात कुठे घडला हा प्रकार?

Solapur Crime News : औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो. महाराष्ट्रात अनेक औरंगजेब द्वेशी आहेत. औरंगजेबचा इतिहास, औरंगजेबची कबर यावरुन नेहमीच वाद होत असतात. अशातच  औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. 

सोलापुरच्या अक्कलकोट मध्ये काही जणांनी WhatsApp वर औरंगजेबचे स्टेटस ठेवले होते. या प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावामध्ये 14 व्यक्तीनी औरंगजेबचे स्टेटस ठेवले होते. स्टेटस ठेवाणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापुरातील आमदार सचिन कल्याणशेट्टी विधानसभेत  औरंगजेबचे स्टेटस ठेवणा-यांच्या  विरोधात  आक्रमक झाले. औरंगजेबचे  स्टेटस ठेवणा-यांच्या  मुस्क्या आवळा अशी मागणी विधानसभेत  सचिन कल्याणशेट्टी यांनी केली होती. तसंच औरंगजेबचे स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढण्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी नवी मुंबईमध्ये देखील औरंगजेबचे स्टेटस ठेवल्यानं एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशीमध्ये एका तरुणानं औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्याला अटक करण्याची मागणी सकल हिंदू समाजाने केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आणि समज दिली. मात्र, यामुळे सकल हिंदू समाज आक्रमक झालाय. धार्मिक भावना भडकावल्यानं सकल हिंदू समाजानं वाशी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन स्टेटस ठेवणाऱ्याला अटक करण्याची मागणी केली होती.

 

Read More