Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक ! महिला पोलिसाने पोलीस स्टेशनमध्येच उचललं हे टोकाचं पाऊल

परिसरात एकच खळबळ, पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाची... 

धक्कादायक ! महिला पोलिसाने पोलीस स्टेशनमध्येच उचललं हे टोकाचं पाऊल

Crime News :  ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिता भीमराव व्हावळ असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. 

अनिता यांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक म्हणुन कार्यरत होत्या. 2008 मधील बॅचच्या त्या महिला पोलीस कर्मचारी होत्या.

अनिता यांचं घरी पतीसोबत भांडण सुरू होतं या घरगुती वादातूनच त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्रीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू केला आहे. 

अनिता यांना दुपारी दीड वाजता स्टेशनमधील इतर महिला पोलिसांनी पाहिलं. अनिता यांच्या मागे दोन मुली आणि पती असा परिवार आहे.

Read More