Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'माहेरुन 10 लाख आण नाहीतर पोटावर गुच्ची मारुन...', कोल्हापुरात वैष्णवीपेक्षाही धक्कादायक प्रकरण! गर्भवती पत्नीचा छळ करुन...

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्य हादरलेलं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. माहेरून दहा लाख रुपये आण नाहीतर पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकीच नवऱ्याने दिली होती.   

'माहेरुन 10 लाख आण नाहीतर पोटावर गुच्ची मारुन...', कोल्हापुरात वैष्णवीपेक्षाही धक्कादायक प्रकरण! गर्भवती पत्नीचा छळ करुन...

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्य हादरलेलं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळीमध्ये हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे पतीने माहेरून दहा लाख रुपये आण नाहीतर पोटावर लाथ मारून ठार मारेन अशी धमकी पत्नीला दिली होती. याप्रकरणी पती रोहित दुधाने याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांकडून उघड झाले होते. संबंध उघड होताच रोहित दुधाने याने नातेवाईक महिलेवर जीवघेणा हल्ला केला होता. 

प्रेमविवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच 10 लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळीमध्ये घडला आहे. संबंधित पीडित महिलेनं पतीविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहीत अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी ता. करवीर) असं पतीचे नाव आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत ऑक्टबर 2024 ते 2 जून 2025 पर्यंत पती रोहितने तुझ्या आई वडिलांनी मला लग्नात काहीच दिले नाही, त्यामुळे दहा लाख रुपये दे म्हणत मारहाण करुन माझा शाररीक, मानसिक छळ करत जीवे मारणेची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

पीडितेचं नर्सिंगचे शिक्षण घेत असताना रोहितशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात रोहित आणि पीडितेचा विवाह कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत झाला. विवाहानंतर चार महिन्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये गर्भवती राहिल्यानंतर रोहितने किरकोळ कारणांवरून पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली.

10 लाख रुपये दे नाही, तर मला सोडून जा

पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, रोहित रोज कामावरुन आल्यानंतर मला बाळ नको असल्याचं सांगत गर्भपात करून मला घटस्फोट दे अशी मागणी करायचा. तसंच तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, मला आता 10 लाख रुपये दे नाही, तर मला सोडून जा असं म्हणून त्रास देत होता. यानंतर 25 एप्रिल 2025 मध्ये सातव्या महिन्यात रोहितने पत्नीला माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर पत्नीने पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. 17 मे रोजी पीडिताच्या मामांनी मध्यस्थी केल्यानंतर सासरी नांदण्यास गेली होती.

पोटावर मारुन तुला ठार मारीन

घरातून लवकर जाण्यासंदर्भात विचारणा केली असता रोहितने पत्नीला शिवीगाळ करत "तू पहिल्यांदा गर्भपात कर, मग बोल, तू माझ्याकडे राहू नको, निघून जा" अशी धमकी दिली. संध्याकाळी उशिरा आल्यानंतर विचारणा केली असता तू मला काही विचारायचं नाही. पोटावर गुच्ची मारून ठार मारीन अशी रोहितने धमकी दिली.

विवाहबाह्य संबंध उघडकीस येताच पत्नीच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला

विवाहित महिलेने आपला पती रोहित त्रास देत असल्याबाबत आई वडील आणि कोल्हापुरातील मामांना सांगितले होते. रोहितला पत्नीच्या नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने पिडीत महिलेच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये पत्नीची मामी गंभीर जखमी झाली तर दोन मामा किरकोळ जखमी झाले. नातेवाईकांनी यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील इस्फूरली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रोहितचा शोध घेऊन त्याला अटक देखील केली.

Read More