गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील न्यायाधीश बोअरमध्ये मृत साप अडकल्यानंतर तेच पाणी पित होते. मृत साप अडकला होता, त्याच बोअरचं पाणी पित राहिल्याने न्यायाधीशांची प्रकृती बिघडली होती. त्यांनी तपासणी केली असता याबाबत खुलासा झाला. मात्र यावेळी त्यांना सरकारी अनास्थेचा सामना करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अहेरी नगर पंचायत प्रशासन ढिम्मच राहिलं होतं. न्यायाधीशानी स्वतः प्रयत्न करत स्थानिक मजुराकरवी साप बाहेर काढत स्वच्छता करुन घेतली. स्वत: न्यायाधीशांना सरकारी संथ कारभाराचा अनुभव घ्यावा लागला.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश शाहीद साजदुजम्मा एम. एच. त्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या बोअरमध्ये मृत साप अडकल्यावर अनभिज्ञ राहत तेच पाणी पीत राहिले. त्यांची प्रकृती बिघडल्यावर तपासणी केली असता याबाबत खुलासा झाला.
न्यायाधीशांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अहेरी नगर पंचायत प्रशासन ढिम्म राहिलं आणि काहीच कारवाई केली नाही. परिणामी न्यायाधीशानी स्वतः प्रयत्न करत स्थानिक मजुराकरवी साप बाहेर काढत बोअरची स्वच्छता करवून घेतली. हे करताना त्यांना शासकीय निवासस्थान देखील सोडावे लागले. हे संकट ओढविल्यावर न्यायाधीशानी सरकारी संथ कारभाराचा नमुना अनुभवला.