Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, लाथा बुक्क्यांनी धु धु धुतलं, पाहा Video

वीजबिल न भरलेल्या हॉटेल मालकाची मुजोरी!

महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, लाथा बुक्क्यांनी धु धु धुतलं, पाहा Video

Mahavitaran : महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण (Mahavitran employee assaulted) झाल्याच्या घटना अनेकदा ग्रामीण भागात पहायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना आता हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील औंढा नगनाथ (Aundha Nagnath) येथे घडल्याचं पहायला मिळलं आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला तिघांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे सध्या औंढामध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. (A Mahavitaran employee was brutally beaten at Aundha Nagnath in Hingoli district)

वीजबिल थकवल्यामुळे महावितरणाचे हे कर्मचारी हॉटेलचं वीज कनेक्शन कापण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालकाला सव्वा आठ हजार रुपयांची थकबाकी भरण्यास सांगितलं. मात्र, हॉटेल मालकाने थकबाकी भरण्यास पैसे नसल्याचं सांगत त्यांना परत जाण्यास सांगितलं. त्यानंतर मोठा वाद पेटला.

आणखी वाचा - Shivsena Symbol : 'शिवसेना आमच्या बापाचं नाव, कुणीही आलं तरी....', अरविंद सावंत यांची जहरी टीका!

हॉटेल मालकाने शिवीगाळ केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी खांबावर चढताच मारहाण केल्याची घटना घडली. हॉटेल मालक आणि त्याच्या कुटुंबियांनी दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, सहाय्यक अभियंताच्या तक्रारीवरून तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अडलेल्या या प्रकरणानंतर औंढा नगनाथ एकच चर्चा सुरू आहे.

Read More