Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रात्रीच्या अंधारात अल्पवयीन मुलाच्या तोंडात गोळा कोंबला अन् नंतर...; कोल्हापूरच्या मदरशामधील CCTV पाहून पोलीस हादरले

कोल्हापुरात अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र यापेक्षा धक्कादायक यामागील कारण आहे. तरुणाने तोंडात गोळा कोंबून विजेचा शॉक देऊन मित्राची हत्या केली आहे.   

रात्रीच्या अंधारात अल्पवयीन मुलाच्या तोंडात गोळा कोंबला अन् नंतर...; कोल्हापूरच्या मदरशामधील CCTV पाहून पोलीस हादरले

कोल्हापुरात अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र यापेक्षा धक्कादायक यामागील कारण आहे. मदरसा बंद होऊ सुट्टी मिळावी यासाठी मुलाने आपल्यात मित्राला ठार केलं. तरुणाने तोंडात गोळा कोंबून विजेचा शॉक देऊन मित्राची हत्या केली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते इथं असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याने 11 वर्षीय फैजान नजिम याच्या तोंडात गोळा कोंबला, त्यानंतर विजेचा शॉक देऊन खून केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खून झालेला 11 वर्षीय फैजान नजिम हा बिहार राज्यातला आहे. कोल्हापूर पोलिसांनी तपास करून अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याची हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील आळते इथं निजामिया मदरशात 60 हून अधिक मुलं धार्मिक शिक्षण घेत आहेत. 16 जूनच्या पहाटे पाच वाजता फैजान नजिम या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. यावेळी याच मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी रविवारी रात्री मदरशात झोपलेल्या फैजान नजिम या अल्पवयीन मुलाच्या तोंडात कापडाचा गोळा घालून त्याला विजेचा शॉक देऊन खून केल्याचे समोर आले. 

सुरुवातीला सदर संशयित अल्पवयीन विद्यार्थी घाबरून काहीही सांगत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलाने त्यांच्यासमोर सगळा उलगडा केला. सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी खून केल्याच कबुली त्याने दिली. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Read More