Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात विचित्र अपघात; धावता ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि...

नाशिक जवळ विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रक रेल्वे रुळावर पडला आहे. 

महाराष्ट्रात विचित्र अपघात; धावता ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि...

Nashik Accident : नाशिकमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. पुलावरुन जाणारा भरधाव ट्रक थेट रेल्वे रुळावर पडला आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेत ट्रक बाजूला हटवण्याचे प्रयत्न सुरु केले.  

मनमाड महामार्गावर मनमाड जवळ असलेल्या अनकवाडे या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलावरून येवल्याहून मनमाडच्या दिशेने जात असलेला मालवाहू ट्रक चे नियंत्रण सुटले. हा भरधाव वेगात असलेला ट्रक पुलाचा कठडा तोडून थेट खाली रेल्वे रुळावर जाऊन पडला यात सुदैवाने ट्रक चालक बचावला आहे. मात्र ट्रक हा मनमाड- पुणे लोहमार्गावर पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. 

रेल्वे प्रशासन तथा स्थानिक पोलीस यांच्याकडून रेल्वे ट्रॅक वरील ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे दरम्यान मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मात्र रेल्वे वाहतूक रात्री उशीरापर्यंत विस्कळीत होती. 

दरम्यान, 23 जानेवारी रोजी मोठी दुर्घटना घडली होती. जळगावजवळ  पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या भीतीनं रेल्वे रुळावर उड्या मारलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एक्स्प्रेसनं चिरडल्याची दुर्घटना घडलीये. या घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय. दुर्घटनेत 8 पुरुष, 4 महिलां आणि एका मुलाचा मृत्यू झालाय. तर 10जणांची प्रकृती चिंताजनक आहे.. त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. जळगाव आणि नाशिकदरम्यानच्या परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडलीये. लखनौहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यात परधाडे गावाजवळ धूर येऊ लागला. आग लागल्याच्या भीतीतून रेल्वे प्रवाशांनी रुळांवर उड्या घेतल्या त्याचवेळी बंगळुरु-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं. 

Read More