जमाना इतका बदललाय की कधी कुठे काय घडेल, कोणती बातमी समोर येईल याचा काही नेम नाही. अमरावतीत अशीच एक घटना घडली आहे. एका पत्नीनं पतीला लुटण्याचा कट आखला. त्यासाठी 1200 रूपयांची सुपारी दिली. काय नेमकं आहे हे प्रकरण, जाणून घ्या.
सध्या पत्नीनं पतीला संपवलं, अशा बातम्या सातत्यानं समोर येत असताना अमरावतीमधल्या एका घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका पत्नीनं स्वत:च्याच पतीला लुटण्यासाठी आणि बेदम मारण्यासाठी 1200 रूपयांची सुपारी दिली. नवरा बायकोमधल्या वादाचं कारण कळलं तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. कारण या पती पत्नीमध्ये वादाचं कारण मालमत्ता होतं.
- 25 एप्रिलला 31 वर्षीय अजय राठी पत्नीसह मोपेडवरून जाताना तीन चार जणांचा हल्ला
- हॉकी स्टीकनं अजयला बेदम मारहाण
- गळ्यातली चेन आणि दोन अंगठ्या असा एकूण 95 हजार रूपयांचा ऐवज लुटला
- अजय राठीची पोलीस ठाण्यात धाव
- तपासादरम्यान हल्ला पूर्वनियोजित असल्याची माहिती
- पत्नीनंच 1200 रूपये देऊन पतीला मारायची सुपारी
पण पत्नीनं असं का केलं य़ामागचं कारण समोर येताच पोलीसही चक्रावले. या दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, अशी माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा हिस्सा तसंच दरमहा 15 हजार रूपये पत्नीला देणार तसंच महिन्यातून एकदा माहेरी जाता येणार असा तोंडी करार त्यांच्यात झाला होता. लग्नानंतर अजयनं पैसे द्यायला नकार दिला. त्या रागापोटी त्याच्या पत्नीनं हा कट रचला आणि सुपारी दिली. यात तिला तिच्या मावस भावानंही साथ दिली. मारहाण करणा-यांमध्ये मावसभाऊ आणि त्याचे दोन मित्र आहेत. पोलिसांनी याचा छडा लावला आणि त्या पत्नीसह तिघांनाही अटक केलीय.
पैशाच्या मोहापायी नव-याला अद्दल घडवण्यासाठी सुपारी देणा-या पत्नीची कीव येतेय.. नाती खरंच इतकी तकलादू झालीयत का.. आपण माणूसपण हरवत चाललोय का.. याचा विचार व्हायला हवा...