Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एक हृदय, एकच शरीर पण डोकी दोन; महिलेने दिला तिळ्यांना जन्म

एका महिलेच्या पोटात जुळ नाही तर तिळ वाढत होते. एक बाळ सुखरुप होते पण दोन बाळ एकमेकांना चिकटलेली होती. यांचे शरीर एक पण डोकी मात्र दोन आहेत. 

एक हृदय, एकच शरीर पण डोकी दोन; महिलेने दिला तिळ्यांना जन्म

Multiple Birth:  आई होण्याची चाहूल हा प्रत्येक महिलेसाठी अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण असतो. आपलं बाळ सुखरुप असावं असचं प्रत्येक आईला वाटत असते. जळगाव मध्ये एका महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला. मात्र, या बाळांच्या जन्मानंतर ही माता एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकली. एकीसाठी आंनदी व्हावे की दोघींसाठी दु:खी असा प्रश्न या महिलेला पडला. कारण एक बाळ सुखरुप असले तरी दोन बाळ जुळी होती. या मुलींना दोन वेगवेगळी डोकी आणि एकच धड आहे.

जळगावच्या एका खासगी रुग्णालयात या महिलेची प्रसुती झाली. या महिलेने तीन मुलींना जन्म दिला. त्यात दोन मुली या ''जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर, तिसऱ्या मुलीची तब्येत उत्तम आहे. जळगाव जिल्ह्यात अशी प्रकारची पहिलीच घटना घडली असल्याची माहिती डॉ. वैभव महाजन यांनी दिली आहे.

जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेची काही महिन्यांपूर्वी गर्भधारणा राहिली झाली होती. त्यानंतर तपासणी केली त्या वेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ सुरक्षित असल्याने गर्भपाताचा पर्यायही संपला. त्यामुळे या दाम्पत्याने बाळंतपणासाठी तयारी दाखविली.

गर्भधारणेपासून या महिलेची विशेष खररदारी घेण्यात येत होती.  डॉ. नवाल यांनी सिजेरियन शस्त्रक्रियेद्वारे या महिलेची प्रसूती केली. नवजात लेकींपैकी जुळलेल्या जुळ्यांना तातडीने बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरव महाजन यांच्याकडे उपचार सुरू केले.

शरीर, हात आणि पाय एकत्र 

नवजात जुळ्या मुलींचा मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र शरीर, हात आणि पाय एकत्र आहेत. त्यामुळे दोघींना दोन हातांनी आणि पायांनी सोबत जगावे लागणार आहे. दोघींना एकच हृदय आहे. यापुढेही हे जुळे आयुष्यभर ही असेच राहु शकतात असे मत बाल रोग तज्ज्ञ डॉक्टर गौरव महाजन यांनी व्यक्त केले आहे.

26 बोटं असलेलं बाळ

हात किंवा पायाला एक-दोन बोटं अधिक असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. मात्र चक्क 26 बोटं असलेलं बाळ यावल तालुक्याच्या न्हावी गावात जन्माला आले. वैद्यकीय इतिहासातील ही दुर्मिळ घटना मानली गेली. नवजात बाळाच्या दोन्ही हाताला एक-एक तर दोन्ही पायाला दोन-दोन अधिकची बोटं आहेत. या बाळावर सहा महिने ते एक वर्षापर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

Read More