Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आखवे कुटुंब भारतात येऊन जपताय मराठी संस्कृती

मराठी संस्कृती जपण्यासाठी आखवे कुटुंबाचा प्रयत्न...

आखवे कुटुंब भारतात येऊन जपताय मराठी संस्कृती

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : आजच्या स्पर्धच्या युगात आपला मुलगा कसा टीकणार याची चिंता नेहमी पालकांना असते. आजकाल प्रत्येक ठिकाणी इंग्रजी वापरली जाते. मराठी संस्कृती जपण्यासाठी अमोल आखणे यांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे. यामुळे अमोल आखवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमोल आखणे यांचे कुटुंब 16 वर्षापासून स्वीझर्लंड स्थायिक आहे मात्र मातृभूमिचे प्रेमामुळे ते आपल्या मायदेशी परत आले आहेत. 

बरेच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी चांगलं जमलं पाहिजे अशा प्रयत्नात असतात. त्यामुळे अनेक पालकवर्ग त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. मात्र आखणे कुटुंब आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी आजही प्रयत्न करताना दिसत आहे. 

fallbacks

अमोल आखवे हे मूळ मुंबईचे मात्र कामानिमित्त स्विझर्लंडला गेले आणि तिथे कोरिना शार्कप्लाटज यांच्याशी विवाह करून तिथेच मागील 16 वर्षापासून स्थायिक झाले. त्यांना दोन मूलं आहेत. मार्क आणि यान. ही मुलं जरी स्वीझर्लंडमधील संस्कृतीत वाढली असली तरी मराठी संस्कृती आणि भाषा विषयी असणारी ओढ त्यांना स्वदेशी घेऊन आली.परदेशात राहून मातृ भाषेचे ज्ञान आपल्या मुलांना झालं पाहिजे यासाठी अमोल धडपड करत आहे. परदेशातून भारतात परत येऊन त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यामाच्या शाळेत दाखल केलं. 

कोरिना शार्कप्लाटज यांनी नोकरीत 3 महिन्यांची रजा घेतली. अमोल यांनी आपल्या बायकोच्या आग्रहास्तव मुलांना मातृभाषा व मराठी संस्कृती कळावी यासाठी या मराठी शाळेत घालण्याचा आग्रह केला आणि दहिसर पूर्व च्या शेलेंद्र विद्यालयात हे मागील 2 महिन्यापासून मराठीचे धडे घेत आहेत. आता हे कुटुंब मराठी शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देतंय.

आता सुट्टी संपल्यानंतर हे कुटुंब स्वीझर्लंडला परत जातील पण जाताना मराठीचे धडे घेऊन जाणार आहेत. आता ही मुलं मराठीत बडबड गीत सुद्धा गाऊ लागली आहेत. भारतातील अनेक पालक आपल्या मुलांना मातृभाषे ऐवजी इंग्रजी भाषा आग्रह करून शिक्षण देतात. त्यामुळे आता आखणे कुटुंब मराठी भाषिकांसमोर चांगल उदाहरण ठरलं आहे. 

Read More