Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आषाढी एकादशी : आनंदी स्वामींच्या पालखीची 260 वर्षाची परंपरा कायम

 दत्तात्रय आनंदी स्वामी महाराजांची 260 वर्षाची पालखीची परंपरा आजही कायम आहे.

आषाढी एकादशी : आनंदी स्वामींच्या पालखीची 260 वर्षाची परंपरा कायम

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जालन्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या दत्तात्रय आनंदी स्वामी महाराजांची 260 वर्षाची पालखीची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी पालखी मिरवणुकीत भाविक भक्त सहभागी होत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून श्रींच्या पालखीच्या मिरवणुकीला आनंदी स्वामी महाराजांच्या मंदिरापासून सुरुवात होते. 

कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, कसबा भागात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरून ही पालखी गांधीपुतळा मार्गे परत रात्री बारा वाजेच्या सुमारास मंदिरामध्ये पोहचते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी जालना शहरातील नागरीकच नव्हे तर पंचक्रोशीतील पांडुरंगाचे भक्त देखील येतात. पालखीच्या समोर आनंदोत्सव साजरा करताना भक्त मल्लखांब, तलवारबाजी, लाठी फिरवणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचंही सादरीकरण करतात. 

याच दरम्यान विविध ठिकाणी या पालखीची पूजा करून स्वागतही केल्या जातं.पालखीला सुरुवात झाल्यानंतर पालखी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग खुले केले जातात.

Read More