Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रत्नागिरीत ब्रेक फेल झालेला टेम्पो गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू

गणेश विसर्जनादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

रत्नागिरीत ब्रेक फेल झालेला टेम्पो गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू

Ganesh Visarjan 2023 : गणपती विजर्नादरम्यान कोकमात एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झालेला टेम्पो विसर्जन मिरवणुकीत घुसला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये हा भीषण अपघात घडलाय. घटनास्थळी मोटा गोंधळ झाला असून, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रमात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नेमकं काय घडलं?

गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर इथं ही दुर्घटना घडली. येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती.मोठ्या संख्येने लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी एका टेम्पोचा ब्रेक फेल झाला आणि हा टेम्पो थेट मिरवणुकीत घुसला. यात 15 हून अधिक लोक जखमी झालेत. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Read More