औरंगाबाद : औरंगाबाद - जालना महामार्गावर धूत रुग्णालयासमोर भीषण अपघात झाला आहे. रुग्णालयासमोरच भरधाव कारने तीन पादचारी महिलांना जोरदार धडक देत उडवलं. या कारने तीन महिलांना चिरडलं असल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी आहे.
औरंगाबाद - जालना महामार्गावर भीषण अपघात
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 7, 2020
कारची तीन पादचारी महिलांना जोरदार धडक
दोन महिलांचा जागीच मृत्यू, एक महिला जखमीhttps://t.co/HOK58cBO5u#accident #Aurangabad
कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही महिला रुग्णालयात, रुग्णाला पाहायला जात असतानाच हा अपघात झाला. याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरु आहे.