Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सुरत-नागपूर महामार्गावर अपघात, दुचाकीचे दोन तुकडे

जिल्ह्यातील नवी सावरट जवळच्या सुरत-नागपूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीची आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले.

सुरत-नागपूर महामार्गावर अपघात, दुचाकीचे दोन तुकडे

नंदूरबार : जिल्ह्यातील नवी सावरट जवळच्या सुरत-नागपूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीची आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले.

 या अपघातात दोन जण  गंभीर जखमी झाले असून त्यांचावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.जखमींमध्ये भाजपचे नवापूर तालुका सरचिटणीस समीर दलाल आणि त्यांचे मित्र इम्रान यांचा समावेश आहे. समीर दलाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

Read More