Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! अवघ्या 2 हजार रुपयांसाठी केली हत्या

भावाची हत्या करुन आरोपी फरार झाला, पण पोलिसांनी शोधून काढलंच

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! अवघ्या 2 हजार रुपयांसाठी केली हत्या

लातूर : लातूर जिल्ह्याच्या कासारजवळा या गावात भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन हजार रूपयांसाठी सख्ख्या भावनेच भावाचा खून केला. 

लातूर तालुक्यातील कासारजवळा या गावातील नागनाथ आश्रुबा सुडके आणि वैजनाथ आश्रुबा सुडके या दोघा भावांमध्ये वाद झाला. प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत दोन हजार रुपये हप्त्याच्या कारणावरून या दोन सख्ख्या भावात कडाक्याचं भांडण झालं. या भांडणाचं पर्यवसन हाणामारीत झालं. संतापलेल्या नागनाथ सुडके यानं भाऊ वैजनाथ सुडके याच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला. 

या मारहाणीत वैजनाथ सुडके गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचारासाठी तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं पण उपचारा दरम्यान वैजनाथचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी लातूर तालुक्यातील गातेगाव पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बारा तासाच्या आत फरार झालेला आरोपी नागनाथ सुडके याच्या मुसक्या आवळल्या. 

Read More