Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाष्ट्रातील रहस्यमयी गाव! दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात आणि...

Sindhudurg Achara Village : महाष्ट्रातील एका गावात रहस्यमयी प्रथा पाळली जाते. ग्रामस्थ गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी घेऊन गाव सोडून पळून जातात. दर चार वर्षांनी इथं गावपळण होते.    

महाष्ट्रातील रहस्यमयी गाव! दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात आणि...

Achara Gavpalan : महाराष्ट्राच वेगवेगळ्या प्रांतात वेगवगळ्या चालीरीती आणि परंपरा पहायला मिळतात. कोकणात विविध प्रथा पहायला मिळतात. त्यापैकीच एक आहे गावपळ प्रथा.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो वर्षांपासून ही गावपळची प्रथा सुरु आहे. दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात. वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते.  

हे देखील वाचा... कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार

महाराष्ट्रातील विशेषत: कोकणातील काही ठराविक गावांमध्ये आजही ‘गावपळण’ ही परंपरा पाळली जाते. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेचे  आजही पालन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा या गावात न चुकता या परंपरेचे पालन केले जाते. आचरा गावाचे रहिवासी दर चार वर्षांनी या गावपळणीची आतुरतेने वाट पाहत असतात. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांना टक्कर देते कोकणातील एक छोटसं गाव; छुपं हिल स्टेशन

ग्रामदैवताकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो यानंतर गावपळणी प्रथेचे नियोजन केले जाते.  संपूर्ण गावाचं लक्ष या देव काय कौल देणार याकडे लगलेलं असतं. देवाने होकारार्थी कौल देताच गावपळणीची तयारी सुरू होते. तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेशी बाहेर पळून जातं.

दर चार वर्षांनी होणारी ही गावपळण यंदा 15 डिसेंबरपासून सुरू झाली. 3 दिवसांसाठी गाव पळून वेशीबाहेर आला. अर्थात गावातील सर्व लोक आचाऱ्याच्या वेशीबाहेर थांबले आहे. ग्रामस्थ गुरा ढोरांसह घरांना कुलूप लावून गावाबाहेर थांबवले. या दरम्यान गावात पूर्णपणे शुकशुकाट असतो. कुणीही गावात जात नाही.

गावपळण प्रथेची शेकडो वर्षांची परंपरा

आचरे गावात ही प्रथा नेमकी दखी सुरु झाली हे सांगता येवू शकत नाही. मात्र, शेकडो वर्षांपूर्वी आचरे या गावात भूत-पिशाच्यांनी उच्छाद मांडला होता, ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या काळात, गावकऱ्यांनी श्री देव रामेश्वराला शरण जाऊन त्याच्या चरणी साकडं घातलं. देव रामेश्वराने त्यांना तीन दिवस आणि तीन रात्रींकरिता गाव सोडण्याचा आदेश दिला. या कालावधीत, रामेश्वराच्या कृपेने संपूर्ण गाव भूत-पिशाच्यांपासून मुक्त झाला अशी अख्यायिका इथले ग्रामस्थ सांगातात. तर, काही वर्षांपूर्वी गावाता एका साथीच्या आजाराने थैमान घातले होते. यावेळी गावातून संपूर्ण रोगराई नष्ट व्हावी यासाठी ग्रामस्थ गाव सोडून गेले होते असे सांगितले जाते. 

शेकडो वर्षांपासून ग्रामस्थ आजही ही प्रथा पाळत आहेत. ग्रामस्थ आपल्या घरातील गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी आणि कुत्रे घेऊन परिवारासोबत गावच्या वेशीबाहेर तीन दिवसांचा संसार थाटतात. संपूर्ण गाव एकत्र राहतो. सर्व मिळून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करतात. गावातील सर्व लोक एकत्र मिळून जेवण तसेच इतर काम करतात. कुणी कुणाशी वाद घालत नाही. 

17 डिसेंबर ही शेवटची रात्र होती. तीन दिवसानंतर म्हणजेच आज सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा गावात प्रवेश केला. घर आणि आंगणाची झाड लोट करुन ग्रामस्थ संपूर्ण गावचा परिसर स्वच्छ करतात. हे गाव पुन्हा नव्याने आपलं वास्तव्य सुरु करतात. 

Read More