Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाकरेंना 'अस्वस्थ' करणाऱ्या हॉटेलवर कारवाई

उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कुटुंबाला अस्वस्थ करणाऱ्या महाबळेश्वरमधल्या एका शानदार हॉटेलवर कारवाई करण्यात आलीय. मात्र, या कारवाईचा आणि ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचा दावा सनेकडून करण्यात येतोय. 

ठाकरेंना 'अस्वस्थ' करणाऱ्या हॉटेलवर कारवाई

महाबळेश्वर : उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कुटुंबाला अस्वस्थ करणाऱ्या महाबळेश्वरमधल्या एका शानदार हॉटेलवर कारवाई करण्यात आलीय. मात्र, या कारवाईचा आणि ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचा दावा सनेकडून करण्यात येतोय. 
 
हवा पालटासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आलेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना शेजारच्या हॉटेलमधील वरातीच्या नाचगाण्यामुळं अस्वस्थ व्हावं लागल्याची घटना नुकतीच घडली होती.

वारंवार विनंत्या करूनही नाचगाणं न थांबल्यानं आता महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या ‘एव्हरशाइन कीज’ हॉटेलवर कारवाई करण्यात आलीय. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्या रिसॉर्टला टाळं ठोकलंय... दरम्यान, हॉटेलवरील कारवाई आणि उद्धव ठाकरेंचा काहाही संबंध नाही, असा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय.

Read More