Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अभिनेता सलमान खान अडचणीत, अनिवासी भारतीयाची तक्रार

 सलमान खान अडचणीत सापडलाय. कोणत्याही सिनेमामुळे नाही तर एका अनिवासी भारतीय (एनआरआय) कुटुंबामुळे. 

अभिनेता सलमान खान अडचणीत, अनिवासी भारतीयाची तक्रार

मुंबई : अभिनेता सलमान खान अडचणीत सापडलाय. कोणत्याही सिनेमामुळे नाही तर एका अनिवासी भारतीय (एनआरआय) कुटुंबामुळे. सलमानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसजवळ अनिता आणि केतन कक्कड या दाम्पत्याची जमीन आहे. १९९६ साली त्यांनी ही जमीन विकत घेतली. मात्र त्यानंतर कक्कड कुटुंबीय अमेरिकेत स्थाईक झाले. १८ वर्षानंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर जमिनीसाठी सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय आपल्याला त्रास देत असल्याची त्यांनी तक्रार केली आहे.

कक्कड कुटुंबियांना त्यांच्या घरात जाण्यासाठी त्रास होतो. तसंच इतर आजूबाजूंच्या घरांमध्ये वीज पुरवठा व्यवस्थित सुरु आहे. मात्र त्यांनाच वीजपुरवठा होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. याबाबत त्यांनी सलमानला कायदेशीर नोटीस बजावली असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या कुटुंबीयांनी न्याय मागितला आहे. वनमंत्र्यानीही मदत करण्याचं त्यांना आश्वासन दिले आहे.

Read More