Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक

अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक करण्यात आली आहे.

 अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक

गोंदिया : अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक करण्यात आली आहे. महिलेची छेडछाड केल्याचा आरोप विजय राजवर आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी विजय राज गोंदियात आला असताना त्याला महिलेच्या छेडछाड प्रकरणी अटक करण्यात आली आहे.  महिला सहकाऱ्याची छेडछाड केल्याचा आरोप अभिनेता विजय राजवर आहे. शेरनी चित्रपटाच्या शुटिंगसाठी शहरालाच लागून असलेल्या बालाघाट परिसरात ही शुटिंग सुरू आहे. 

बालाघाटचा भाग मध्य प्रदेशात येतो. मात्र शेरनी चित्रपटाचा क्रू हा मागील १५ दिवसांपासून गोंदियाच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. या दरम्यान ३० वर्षीय महिलेची काही दिवसांपूर्वी अभिनेता विजय राज याने छेडछाड केल्याचा आरोप आहे.

चित्रपटातील क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन कलम ३५४ अ आणि ड प्रमाणे विजय राज याला अटक करण्यात आली आहे. याबाबतील गुप्तता पाळण्यात येत आहे. तसेच संबंधित हॉटेलमध्ये पत्रकारांना देखील प्रवेश नाकारण्यात येत आहे.

Read More